राकेश गुडेकर, प्रतिनिधी
ADVERTISEMENT
रत्नागिरी: एकनाथ शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी आदित्य ठाकरेंच्या शिव संवाद यात्रेला उत्तर देण्यासाठी सभा घेतली. त्यात शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्यावरती जहरी टीका केली. आता त्याला शिवसेने नेते तथा आमदार भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
भास्कर जाधव पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाले?
”लोकशाहीमध्ये कोणी कुठे सभा घ्यावी याला आक्षेप नाही. रामदास कदम असे म्हणाले मी विनाय नातूंना निवडून आणणार. देशाच्या इतिहासात मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री पराभूत झाल्याचा इतिहास आहे. परंतु राज्याचा विरोधी पक्ष नेत्याला पराभूत करण्याचा इतिहास भास्कर जाधवांनीच केला आहे. दुसऱ्या कोणासाठी भास्कर जाधवांना पराभूत करणे इतके सोपं नाही”, असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.
पुढे भास्कर जाधव म्हणाले ”रामदास कदमांनी वापरेलेली भाषा अजून कुणी वापरेलेली नाही. जी भाषा रामदास कदमांनी वापरली जसं-जसं ते महाराष्ट्रात जातील, तसं तशी रामदास कदम यांची जोड्यांनी पुजा करतील. उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. मुंबईमध्ये शौचालयात जेवढी घाण नाही, तेवढी घाण रामदास कदमांनी ओकली आहे.”
रामदास कदम यांना तात्काळ पदावरुन हाकला- भास्कर जाधव
रामदास कदम यांना तात्त्काळ वेड्याच्या हॉस्पीटलमध्ये दाखल करायला हवे. शिंदे यांची प्रतिमा रामदास कदम यांच्यामुळे मलिन होत आहे त्यांना तात्काळ या पदावरून हाकला असं भास्कर जाधव म्हणाले आहेत. बाळासाहेबांच्या कुटुंबाचे फोटो लावता त्यांच्यावर आक्षेप घेता. मुख्यमंत्री म्हणुन रामदास कदम यांना वेळीच दूर करा, हा माणूस काहीना काहींना अघटीत घडवेल असा सल्लाही भास्कर जाधवांनी एकनाथ शिंदे यांना दिला आहे.
उदय सामंत यांच्याबद्दल केलेले भाकित त्यांचा वर्मी लागलं
उदय सामंत यांच्याबद्दल केलेले भाकित त्यांचा वर्मी लागलं आहे, तुम्ही त्रास देत होता ते सहन करत होते. शरद पवार यांचा मी झालो कि नाही हे शरद पवार ठरवतील. महाविकास आघाडी तोडा हे कधी सांगायला गेले. रामदास कदम म्हणाले होते मी राष्ट्रवादीत येतो. रामदास कदम माझ्याकडे आले होते विरोध करू नकोस सांगायला. पवार यांना मला कॅबीनेट मंत्री द्यायला सांग. असं मला रामदास कदम बोलल्याचं भास्कर जाधव म्हणाले आहेत.
रामदास कदम मुलाला घेवून शिवसेनेवरती उलटले
भास्कर जाधवांनी यावेळी बंडाची आठवण करुन देत कदमावरती टीका केली आहे. ”ज्या शिवसेनेला आई मानत होता त्याच्या तुम्ही मुलाला घेवून उलटला,” असं जाधव म्हणाले. प्रताप सरनाईकांच्या क्लोजर रिपोर्टवरतीही भास्कर जाधवांनी प्रतिक्रिया दिली आहे. तीन वर्ष तुम्ही या माणसाला छळले, नात्या-गोत्यात, पै-पाहूण्यात त्यांची बदनामी कशी भरून येणार. प्रताप सरनाईक यांची चौकशी बंद झाली याचा आनंद आहे. खोटी चौकशी करायची, त्या माणसाला काय त्रास होते हे जवळून पाहिलय असं भास्कर जाधव म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT