मुंबई: राज्यात शिवसेनेच्या पुढाकाराने महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून प्रामुख्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते हे ईडीच्या रडारवर आले आहेत. याच सगळ्यात सलग दुसऱ्या दिवशी शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. कारण काल (25 मे) शिवसेना नेते यशवंत जाधव यांना ईडीने फेमा अंतर्गत नोटीस बजावली होती. त्यानंतर आता शिवसेनेतील महत्त्वाचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या ठिकाणी ईडीने छापेमारी सुरु केली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, दापोली रिसॉर्टप्रकरणी ईडीने ही कारवाई सुरु केली आहे. सध्या ईडीकडून मुंबई, पुणे, रत्नागिरी आणि दापोली याठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
अनिल परबांवर ईडीची नेमकी कारवाई का?
दापोली, पुणे आणि मुंबई या ठिकाणी ईडीकडून छापेमारी सुरु आहे. तसेच अनिल परब यांच्या जवळच्या लोकांची देखील चौकशी सुरु आहे. ईडीच्या वेगवेगळ्या टीम हे वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल परब यांनी दापोलीमध्ये जो रिसॉर्ट बांधला आहे याच रिसॉर्टसंबंधीच जी केस होती त्याचसंदर्भात ईडीने ही मनी लाँड्रिंगची केस घेतली आहे. ईडीने आजच याबाबत चौकशी आणि छापेमारी सुरु केली आहे. दापोली आणि रत्नागिरी येथे अद्यापही ईडीकडून छापेमारी सुरुच आहे.
अनिल परब यांनी दापोलीत एक रिसॉर्ट बांधला होता. त्याच रिसॉर्टला नॉन-अॅग्रीकल्चरल म्हणून टॅग केलं होतं. त्यानंतर अशीही माहिती समोर आली की, त्या जमिनीची जी किंमत होती ती देखील त्यांनी खोटी दाखवली होती. त्याशिवाय जो सात-बाराचे रेकॉर्ड होते. ते NA मध्ये सापडले नाही.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील या रिसॉर्टविरुद्ध अनेक तक्रारी केल्या होत्या. याच रिसॉर्टवर कारवाई देखील करण्यात आली होती. जेव्हा चौकशी झाली तेव्हा असं समजून आलं की, या सगळ्या व्यवहारात काही फेरबदल करण्यात आलं होतं.
तसेच यामध्ये जे तटीय नियमन असतात त्याचे देखील उल्लंघन झाले होते. त्यामुळेच या रिसॉर्टवर कारवाई करण्यात यावी असं सोमय्या यांनी मागणी केली होती.
हिंमत असेल तर रिसॉर्ट तोडून दाखवा – अनिल परबांचं किरीट सोमय्यांना आव्हान
ADVERTISEMENT