बिग बॉस मराठीच्या चौथ्या सिझनला धुमधडाक्यात सुरूवात झाली आहे. यावेळचा सिझन एकदम हटके ठरणार आहे. बिग बॉस मराठीचा चौथा सिझन सुरू झाला आहे. हा सिझन वेगळा ठरणार आहे या सिझनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांच्या नावांवरूनच कळतं.
ADVERTISEMENT
बिग बॉस मराठीचे स्पर्धक कोण कोण आहेत?
तेजस्विनी लोणारी
प्रसाद जवादे
अमृता धोंगडे
निखिल राजेशिर्के
समृद्धी जाधव
अक्षय केळकर
अपूर्वा नेमळेकर
योगेश जाधव
अमृता देशमुख
यशश्री मसुरकर
विकास सावंत
मेघा घाडगे
त्रिशूल मराठे
रूचिरा जाधव
रोहित शिंदे
चौथ्या पर्वात हटके स्पर्धक
हे सगळे स्पर्धक बिग बॉस मराठीच्या घरात सहभागी झाले आहेत. मेघा घाडगे या लावणी क्वीन आहेत. तर अपूर्वा नेमळेकर ही रात्रीस खेळ चाले सीरियलमधली शेवंताही बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. प्रत्येक स्पर्धक काही ना काही वेगळेपण असलेला आणि जपणारा आहे. तर या सगळ्यांचे रिंगमास्टर असणार आहेत महेश मांजरेकर. महेश मांजरेकर हे त्यांच्या चावडीवर बिग बॉसच्या स्पर्धकांची शाळा घेताना दिसतील.
आत्तापर्यंत बिग बॉस मराठीचे ३ सिझन पार पडले. पहिल्या आणि तिसऱ्या सिझनला चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसाच आता चौथ्या सिझनलाही मिळेल अशी अपेक्षा आहे. महेश मांजरेकर यांनी विविध स्पर्धकांचं स्वागत केलं आहे.
बिग बॉस ४ ची घोषणा झाल्यापासूनच उत्सुकता शिगेला
बिग बॉस मराठी ४ ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बिग बॉस मराठी ४ चे पुढचे १०० दिवस हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. कलर्स मराठीवर नुकतंच याचा ग्रँड प्रीमियर पार पडला. महेश मांजरेकरांनी घरात सहभागी झालेल्या स्पर्धकांचे अनोख्या स्टाइलमध्ये स्वागत केले आहे.
बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात डॉ. रोहित शिंदे सहभागी होणार आहे. रोहित हा रुचिरा जाधवचा बॉयफ्रेंड आहे. पण त्याला मॉडेलिंगची देखील विशेष आवड आहे. त्याने ‘मिस्टर इंडिया मॅन ऑफ द ग्लोब इंटरनॅशनल’साठी मॉडेलिंग केलं आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात ‘माझ्या नवऱ्याची बायको’मधील माया फेम अभिनेत्री रुचिरा जाधव ही सहभागी होणार आहे. या मालिकेतून ती प्रसिद्धीझोतात आली.
ADVERTISEMENT