अकोला जिल्ह्यातील पिंपळखुटा शिवारात एका तलावाजवळ अनेक पक्षी मृतावस्थेत आढळल्यामुळे खळबळ माजली आहे. ६ मोर, ७ लांडोर, २ चिमण्या आणि ३ टिटव्या असे पक्षी या भागात मृत आढळले, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली.
ADVERTISEMENT
मृत्यूमुखी पडलेल्या पक्ष्यांची शिकार झाली की त्यांचा कोणत्या आजारामुळे मृत्यू झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही. सर्व पक्ष्यांचं शवविच्छेदन करण्यासाठी नमुने हैदराबाद येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. घटनास्खळावर वनअधिकाऱ्यांने गहू मिळाले आहेत. हे गहू देखील वनअधिकाऱ्यांनी चाचणीसाठी पाठवले आहेत. शिकारीच्या उद्देशाने हे गहू इथे ठेवण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जातोय.
ADVERTISEMENT