उंदीर माजला तरी बैलगाडी ओढू शकत नाही – निवडणूक निकालांवरुन पडळकरांचा विरोधकांना टोला

मुंबई तक

• 03:43 PM • 10 Mar 2022

देशात पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पंजाबचा अपवाद वगळता इतर राज्यांत भाजपने दमदार कामगिरी केली. उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर या राज्यांत काँग्रेसची अतिशय दयनीय अवस्था झाली तर गोव्यात काँग्रेस भाजपला म्हणावी तशी स्पर्धा देऊ शकलं नाही. या निकालावरुन महाराष्ट्रात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांना शेलक्या शब्दांत टीका केली आहे. आपला कोंबडा आरवल्याशिवाय दिवस […]

Mumbaitak
follow google news

देशात पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पंजाबचा अपवाद वगळता इतर राज्यांत भाजपने दमदार कामगिरी केली. उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर या राज्यांत काँग्रेसची अतिशय दयनीय अवस्था झाली तर गोव्यात काँग्रेस भाजपला म्हणावी तशी स्पर्धा देऊ शकलं नाही. या निकालावरुन महाराष्ट्रात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांना शेलक्या शब्दांत टीका केली आहे.

हे वाचलं का?

आपला कोंबडा आरवल्याशिवाय दिवस उगवत नाही असं काही कोंबड्यांना वाटत आहे, असं वाटणारी लोक एकत्र येऊन मोदींविरुद्ध कटकारस्थान करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 पासून गावगाड्यातील लोकांना केंद्रस्थानी मानून काम केले आहे. ग्रामीण तसेच शहरी भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 2014 मध्येच सुरु झाले. राष्ट्रीयत्वाच्या मुद्यावर मोदींनी प्रखर भूमिका घेतली आहे. देशातील नागरिकांना हे मान्य आहे, असं पडळकर म्हणाले आहेत.

सर्वज्ञानींच्या झंजावाती दौऱ्यांचा परिणाम! निकालांवर चित्रा वाघ यांचा राऊतांना खोचक टोला

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोपीचंद पडळकर पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रहित कशात आहे, विकास कशाममुळे होतो यावर नागरिकांची मते ठरलेली आहेत. त्यामुळे भाजपच बाजी मारणार आहे. विरोधकांनी जे अंदाज व्यक्त केले होते, ते अंदाज फेल गेले आहेत. उंदीर माजला म्हणून तो बैलगाडी ओढू शकत नाही. असे कितीही लोक एकत्र आले तरी फरक पडणार नाही. हे पुन्हा एकदा या निकालातून स्पष्ट झालं आहे असंही पडळकर म्हणाले.

शिवसेना-राष्ट्रवादीपेक्षा मतदारांची NOTA ला पसंती, गोव्यात आघाडीची खिचडी शिजलीच नाही

    follow whatsapp