बारामतीपासून घड्याळ बंद करण्याचा भाजपचा कार्यक्रम; बावनकुळेंचा पवारांना इशारा

मुंबई तक

• 10:06 AM • 16 Sep 2022

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं मिशन १४४ वर काम सुरू केलंय. लोकसभेच्या १४४ जागांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे आणि यावरूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना इशारा दिलाय. नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘आम्हाला शरद पवारांवर व्यक्तिगत आरोप करायचे नाहीत. आम्हाला व्यक्तिगत आरोप करून मोठंही […]

Mumbaitak
follow google news

२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं मिशन १४४ वर काम सुरू केलंय. लोकसभेच्या १४४ जागांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे आणि यावरूनच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना इशारा दिलाय.

हे वाचलं का?

नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘आम्हाला शरद पवारांवर व्यक्तिगत आरोप करायचे नाहीत. आम्हाला व्यक्तिगत आरोप करून मोठंही व्हायचं नाहीये. आमची ती संस्कृती आणि परंपरा नाहीये. आम्ही आमच्या कामातून पक्ष वाढवत आहोत.’

लोकसभा निवडणूक २०२४ : “आम्ही बारामतीपासून घड्याळ बंद करण्याचा कार्यक्रम करू”

पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, ‘आम्ही बारामतीपासून घड्याळ बंद करण्याचा कार्यक्रम करू. त्यांनी ते व्यक्तिगत घेतलं. आमचा पक्ष वाढवताना आम्ही घड्याळ बंद करणारच आहोत. आमचा पक्ष वाढवणारच आहोत. त्यांनी ते व्यक्तिगत घेतलं, पण आम्ही व्यक्तिगत टीका टिप्पणी केली नाही’, असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांना इशारा दिला.

BMC Election : भाजपचं ‘मिशन 135’; आशिष शेलारांची ‘स्ट्रॅटेजी’, ‘त्या’ 20 जागांवर विशेष नजर

‘आम्ही केलेलं विधान ते व्यक्तिगत घेऊन सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत. आम्ही पक्ष वाढवण्यासाठी केलेलं विधानही ते जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. आमचा पक्ष बारामतीमध्ये जिंकून येण्यासाठी प्रयत्न करेलच.’

शिवाजीराव आढळराव पाटलांचं गणित चुकलं, आता भाजप करणार ‘करेक्ट कार्यक्रम’?

घड्याळ बंद होणार हा व्यक्तिगत आरोप नाहीये -चंद्रशेखर बावनकुळे

‘बारामतीमध्ये भाजप निवडून येईल, तर घड्याळ बंद होणार. घड्याळ बंद होणार हा व्यक्तिगत आरोप नाहीये. ते व्यक्तिगत आरोप तयार करून सहानुभूती घेताहेत. त्यातून त्यांचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करताहेत. आमचा पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. शरद पवारांवर आरोप करून आम्हाला पक्ष वाढवायचा नाहीये’, अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली.

    follow whatsapp