पुणे महापालिकेच्या आवारात आज एक धक्कादायक प्रकार पहायला मिळाला. आयुक्तांच्या भेटीसाठी आलेल्या भाजप नेते किरीट सोमय्यांनी शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली आहे. या झटापटीत किरीट सोमय्या महापालिकेच्या पायऱ्यांवर कोसळले. शिवसैनिकांच्या या आक्रमक पवित्र्यांमुळे सोमय्यांना माघारी परतावं लागलं.
ADVERTISEMENT
कोरोना काळात कोविड सेंटरच्या कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात आरोप करुन याबद्दल चर्चा करण्यासाठी किरीट सोमय्या पुणे महापालिकेत आले होते. परंतू यावेळी शिवसैनिकांनी सोमय्या यांची वाट अडवत पुणे महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराचं निवेदन स्विकारावं अशी मागणी केली. काही शिवसैनिकांनी यावेळी प्रचंड गोंधळ घातला. याच झटापटीत किरीट सोमय्या चक्क पायऱ्यांवर कोसळले. यावेळी किरीट सोमय्यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना सावरलं.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आक्रमक भूमिका पाहून सोमय्या यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना गाडीत बसवत गाडी पुढे नेली. यावेळी सुरक्षारक्षकांनी गाडीलाही गराडा घातला गेला होता. या घटनेनंतर पुण्यात भाजप आणि शिवसेनेत पुन्हा एकदा राजकीय तणाव निर्माण झाला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आजच्या प्रकारानंतर शिवसेनेला थेट आव्हान दिलं आहे. “किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत. आम्ही याबद्दल कायदेशीर कारवाई कर, आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. पाया खालची वाळू घसरली तर माणूस बेफाम होतो. त्याला कळत नाही आपण काय करतोय. मुद्दे संपले की माणूस गुद्द्यावर येतो”, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT