बीड जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केज मतदार संघाच्या भाजपच्या आमदार नमिता मुंदडा या आपले पती अक्षय मुंदडा यांच्यासोबत रसवंती गृहात गेले असता त्यांच्या शिपायाला गळ्यावर चाकू लावून लुटण्यात आलं आहे. इतकच नव्हे तर यावेळी आरोपींनी नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांनाही जिवे मारण्याची धमकी दिली आहे. बीड मधल्या अंबाजोगाई शहरात ही घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
या घटनेमुळे शहरात दहशतीचं वातावरण असून लोकं कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न विचारत आहेत. एकेकाळी अंबाजोगाई शहराची ओळख सुसंस्कृत, सांस्कृतिक, शिक्षणाची पंढरी, शिक्षणाचे माहेरघर, शांत, विनादंगल धार्मिक सलोख्याचे शहर अशी होती. परंतू गेल्या काही दिवसांमध्ये हे शहर बदनाम होत चालल्याची भावना बोलून दाखवली जात आहे.
मला रिव्हॉल्वर द्या, कंत्राटदार कट्यार दाखवून बिलांवर सह्या घेतात! बीडच्या अभियंत्याचं पत्र चर्चेत
२१ जानेवारीला संध्याकाळी पाच वाजता भाजपा आमदार नमिता अक्षय मुंदडा या कुटूंबियांसह वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या रसवंती गृहात रस पिण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांचा शिपाई मुराजी प्रकाश साखरे हा रस प्यायलानंतर बाहेर येवून थांबला होता. त्यावेळी बाजुच्या हॉटेल मधून लखन भाकरे (रा.अंबाजोगाई ) हा त्याच्या पाच साथीदारांसह आला व त्याने साखरेच्या गळ्याला चाकु लावून दिड तोळ्याचे लॉकेट व खिशातील सहा हजार चारशे काढुन घेतले. भेदरलेल्या मुराजीने आरडाओरडा केल्यानंतर आमदार मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा आणि इतरांनी त्याला जाऊन सांभाळलं. यावेळी आरोपी लखन भाकरे हा अक्षय मुंदडा यांच्या तावडीत सापडला असता त्याने अक्षय मुंदडा यांना मला सोड नाहीतर तुला खल्लास करेन म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली.
यावेळी शहर पोलीसांना बोलावून.आरोपीस ताब्यात दिले.भाकरेसह इतरावर शहर पोलिस ठाण्यात कलम 395,397 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस निरीक्षक बालासाहेब पवार करत आहेत.
दापोली तिहेरी हत्याकांड : हत्या केल्यानंतर तिन्ही महिलांना दिलं पेटवून; पैशासाठी भयंकर कृत्य
अल्पवयीन पिडीतेवर चारशे नराधमांचा अत्याचार, हाणामारी, शिवीगाळ, विनयभंग, अवैध धंदे, खुन, दरोडे, बलात्कार, चोऱ्यांचे वाढलेले प्रमाण पाहता इथे प्रशासनाचे राज्य आहे की गुंडाराज सुरू आहे असा प्रश्न विचारला जात आहे. आमदार कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली जाते तर चाकूचा धाक दाखवून लुटले जात असल्याने सर्वसामान्याचे काय होईल असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोल्हापूर : मोक्काअंतर्गत कारवाईची धमकी, १० लाखांची लाच स्विकारताना दोन कॉन्स्टेबल जाळ्यात
ADVERTISEMENT