शिवसेना विरुद्ध नारायण राणे यांच्यातला वाद काहीकेल्या कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध केलेल्या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंना झालेली अटक हे नाट्य संपतंय न संपतंय तोच भाजप आमदार नितेश राणेंनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर तोफ डागली आहे.
ADVERTISEMENT
“संजय राऊतसाठी माणसं बाजारात पैसे देऊन बोलण्यासाठी मिळतात. ज्यांना स्वतःलाच माहिती नाही की आपण ठाकरेंचे की पवारांचे त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलायचं”, असा सवाल नितेश राणेंनी विचारला आहे. ते पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भाजप कार्यालयाला भेट देण्यासाठी आलेले होते. यावेळी उपस्थित पत्रकारांना नितेश राणेंनी आपली प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलत असताना नितेश राणेंनी बैलगाडा शर्यतीपासून हिंदू सणांवर निर्बंध घालण्यापर्यंत सर्व विषयांवर आपलं मत व्यक्त करत सरकारवर टीका केली. “महाविकास आघाडीत बसलेल्या बैलांना जोपर्यंत तुम्ही राज्यातुन पळवत नाही तोपर्यत बैलगाडा शर्यत सुरु होणार नाही. बैलगाडा शर्यतबंदीवर पर्यायी मार्ग काढण्याचे राज्य सरकारचे काम आहे मात्र राज्य सरकारने बैलगाडा शर्यतबंदीवर नियोजित अडचण कशी उभी करायची हे दाखवुन दिलं”.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आवळलं आहे, ते बोलूच शकत नाहीत. बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा असताना हिंदू धर्माच्या सणांवर बंदी येतेच कशी, आपण किती वेळ अन्याय सहन करायचा असा सवाल यावेळी नितेश राणेंनी भाजप कार्यकर्त्यांना विचारला आहे. भास्कर जाधवांच्या मुलाला संगमेश्वरच्या मंदीरात कुटुंबासोबत महाअभिषेक आणि आरती करायला मिळते. त्यावेळी कोरोनो होत नाही आणि बंदी फक्त आपल्यालाच घातली जाते. अरे ला कारे करा आणि बाकीचं आमच्यावर सोडा असं म्हणत नितेश राणेंनी भाजप कार्यकर्त्यांना सरकारविरुद्ध पेटून उठण्याचं आवाहन केलंय.
‘कुणीतरी वाईटपणा घ्यावाच लागतो…’ Dahihandi उत्सवावरून CM उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंना उत्तर
ADVERTISEMENT