पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक : भाजप आमदार रणजितसिंह मोहीते-पाटलांना कोरोनाची लागण

मुंबई तक

• 06:45 AM • 07 Apr 2021

एकीकडे राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राज्य सरकारने नियमांमध्ये काही प्रमाणात सूट दिली आहे. राजकीय पक्षांच्या जाहीर सभा, प्रचार यासाठी काही नियम आखून दिले आहेत. परंतू या भागातही राजकीय पक्षांच्या सभेत नियम पायदळी तुडवले जात असल्याचं समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी कॅबिनेट मंत्री जयंत पाटलांच्या सभेत गर्दी झाली होती. यानंतर भाजप उमेदवार […]

Mumbaitak
follow google news

एकीकडे राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी राज्य सरकारने नियमांमध्ये काही प्रमाणात सूट दिली आहे. राजकीय पक्षांच्या जाहीर सभा, प्रचार यासाठी काही नियम आखून दिले आहेत. परंतू या भागातही राजकीय पक्षांच्या सभेत नियम पायदळी तुडवले जात असल्याचं समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी कॅबिनेट मंत्री जयंत पाटलांच्या सभेत गर्दी झाली होती. यानंतर भाजप उमेदवार समाधान अवताडेंच्या प्रचारासाठी पंढरपुरात सभा घेणाऱ्या रणजितसिंह मोहीते पाटलांना कोरोनाची लागण झाली आहे.

हे वाचलं का?

शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्या साखर कारखानदाराला उमेदवारी देताना आम्हाला विचारात घेतलं का? – राजू शेट्टींचा सवाल

रणजितसिंह मोहीते पाटील भाजपचे विधानपरिषदेचे आमदार आहेत. आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन रणजीतसिंह मोहीते-पाटलांनी याची माहिती दिली आहे. आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहन रणजितसिंह पाटील यांनी केलं आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणुक ही चुरशीची होणार आहे. भाजपने समाधान अवताडे यांना उमेदवारी दिली असून राष्ट्रवादी काँग्रेसने दिवंगत आमदार भारत भालके यांचा मुलगा भगिरथ भालकेला उमेदवारी दिली आहे. याव्यतिरीक्त शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनीगी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याव्यतिरीक्त महाविकास आघाडी सरकारमधील महत्वाचा घटकपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही आपला उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारापुढचं टेन्शन वाढलं आहे.

    follow whatsapp