भाजप-मनसेच्या युतीचा नारळ फुटला! जाणून घ्या कुठे झाली युती?

मुंबई तक

• 02:40 PM • 27 Sep 2021

पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि मनसेची युती झाली आहे. वाडा तालुक्यातील तीन जागांसाठी भाजप आणि मनसे एकत्र आले आहेत. मनसे आणि भाजप एकत्र आले असून वाडा तालुक्यातील सापने गण मनसे लढवणार आहे तर मांडा , पालसई , मोज या तीन जिल्हा परिषद जागा भाजप लढवणार आहे . त्यामुळे भाजप मनसे युती […]

Mumbaitak
follow google news

पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि मनसेची युती झाली आहे. वाडा तालुक्यातील तीन जागांसाठी भाजप आणि मनसे एकत्र आले आहेत. मनसे आणि भाजप एकत्र आले असून वाडा तालुक्यातील सापने गण मनसे लढवणार आहे तर मांडा , पालसई , मोज या तीन जिल्हा परिषद जागा भाजप लढवणार आहे . त्यामुळे भाजप मनसे युती ही वाडा तालुक्यात पुरती असली तरी युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून होईल मात्र वाडा येथील विकासासाठी माजी आणि मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांची भेट झाल्याचं केंद्रीय मंत्री कपिल पाटील यावेळी म्हणाले.

हे वाचलं का?

पुण्यातल्या मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली आहे की आपण भाजपसोबत गेलं पाहिजे. आता राज ठाकरे याबाबत काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खरंतर भाजप आणि मनसेची युती होणार का आणि हे सगळं मॉडेल महापालिका निवडणुकीतही ठरवलं जाणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मनसेचं संदीप देशपांडे काय म्हणाले?

मुंबईत काय होणार, पुण्यात काय होणार? महाराष्ट्रात काय होणार? हे आता नंतर ठरणार आहे. पालघरमधला निर्णय स्थानिक पातळीवर घेतला गेला आहे. असाच निर्णय आम्ही नाशिकमध्येही घेतला होता. पालघरबाबत बोलायचं झालं तर पालघरमध्ये लोकांमध्ये महाविकास आघाडीबाबत प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे मतविभाजन होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्यंतरीच्या काळात चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यामुळे भाजप आणि मनसे यांच्यात युती होणार याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसंच नाशिकमध्येही हे दोघे भेटले होते. त्यावेळीही राज ठाकरेंची काही मतं चंद्रकांत पाटील यांनी जाणून घेतली होती. त्यानंतर आता पालघरमध्ये पंचायत समितीसाठी मनसे आणि भाजप एकत्र आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मनसे आणि भाजप यांची युती होईल अशी चर्चा सुरू झाली आहे.

MNS, BJP युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी दिलं उत्तर

महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच शिवसेनेला टक्कर देण्यासाठी भाजपला एका चांगल्या पर्यायाची गरज आहे. तसंच मनसेलाही आपली लढाई जोमाने लढायची आहे त्या अनुषंगाने हे दोन पक्ष एकत्र येऊ शकतात. पालघरचा फॉर्म्युला महापालिका निवडणुकीच्या वेळी वापरला जाईल का? तसा तो झाला तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीही तो कायम राहिल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp