भाजप खासदार उदयनराजे भोसले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

मुंबई तक

• 07:56 AM • 17 Feb 2021

काहीभाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. मराठा आरक्षण हा त्यांच्यातल्या चर्चेचा मुख्य विषय होता. तर इतर विषयांवरही दोघांमध्ये चर्चा झाली. उदयनराजे यांनी यापूर्वी मराठा आरक्षण प्रश्ऩी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. मराठा आरक्षणाचा प्रश्न आहा मागे पडला […]

Mumbaitak
follow google news

काहीभाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. मराठा आरक्षण हा त्यांच्यातल्या चर्चेचा मुख्य विषय होता. तर इतर विषयांवरही दोघांमध्ये चर्चा झाली. उदयनराजे यांनी यापूर्वी मराठा आरक्षण प्रश्ऩी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती. मराठा आरक्षणाचा प्रश्न आहा मागे पडला आहे त्यामध्ये लक्ष घातलं गेलं पाहिजे असंही त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितल्याचं समजतं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांनीही मराठा आरक्षण प्रश्नी लक्ष घालावं असंही आवाहन त्यांनी केलं होतं.

हे वाचलं का?

शरद पवारांना काय केली विनंती?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नात वडिलकीच्या नात्याने लक्ष घालावे अशी मागणी उदयनराजेंनी केली. मराठा आरक्षण प्रश्नी असलेल्या खटल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा वेळकाढूपणा आणि हलगर्जीपणा करू नये त्यासाठी तशा सक्त सूचना राज्य सरकारला दिल्या जाव्यात तसंच हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावला जावा अशी विनंती उदयनराजेंनी शरद पवारांकडे केली.

    follow whatsapp