एका खासदारासाठी लाखो रुपयांची उधळण, बघा ट्रायडंट-ताजमधील एका रुमचे भाडे किती?

मुंबई तक

• 03:32 AM • 08 Jun 2022

मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपने जोरदार तयारी केली आहे. कोणत्याही प्रकारची फोडाफोडी होऊ नये यासाठी रिसॉर्ट पॉलिटिक्स सुरु झालं आहे. फक्त एका खासदारासाठी राज्यातील विधानसभा आमदारांवर आता सर्वच पक्ष लाखो रुपयांची उधळण करणार आहे. 10 जून रोजी होणाऱ्या मतदानाआधी आपले आमदार सुरक्षित राहावे यासाठी मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्स बुक करण्यात आले […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपने जोरदार तयारी केली आहे. कोणत्याही प्रकारची फोडाफोडी होऊ नये यासाठी रिसॉर्ट पॉलिटिक्स सुरु झालं आहे. फक्त एका खासदारासाठी राज्यातील विधानसभा आमदारांवर आता सर्वच पक्ष लाखो रुपयांची उधळण करणार आहे. 10 जून रोजी होणाऱ्या मतदानाआधी आपले आमदार सुरक्षित राहावे यासाठी मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्स बुक करण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

शिवसेनेच्या आमदारांसाठी दक्षिण मुंबईतील ट्रायडंट हॉटेल बुक करण्यात आलं आहे. तर भाजपच्या आमदारांसाठी मुंबईतील प्रसिद्ध ‘ताज’ हॉटेल बुक करण्यात आलं आहे. तर काँग्रेस गोरेगावातील पंचतारांकित हॉटेलमध्ये आपल्या आमदारांना नेणार आहे. तर राष्ट्रवादीच्या आमदारांना कोणत्या हॉटेलमध्ये ठेवायचा याबाबत अद्याप चर्चा सुरु आहे.

आता आमदारांना ठेवण्यात येणाऱ्या या पंचतारांकित हॉटेलचा एका दिवसाचा खर्च किती असतो याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात

राज्यसभेच्या एका जागेसाठी आता राज्यात ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’ सुरु झालं आहे. यासाठी प्रत्येक आमदारावर सर्वच पक्ष लाखो रुपये खर्च करणार आहे. सध्या शिवसेनेच्या आमदारांना ट्रायडंटमध्ये ठेवण्यात आलं आहे. तर भाजपचे आमदारांना ताज आणि काँग्रेसच्या आमदारांना हॉटेल वेस्टईनमध्ये ठेवण्यात येणार आहे.

‘मविआ’ला 12 अपक्ष आमदारांचं बळ, ट्रायडंटमध्ये नेमकं काय घडतंय?

आता आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेऊयात कोणत्या हॉटेलचे नेमके दर किती आहेत.

ट्रायडंट: (शिवसेना आमदारांसाठी)

शिवसेनेने आपले आमदार ज्या ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवले आहेत तिथे वेगवेगळे रुम आहेत.

1. प्रीमियर ओसेन रुम – एक दिवसाचे भाडे 17250 रुपये

2. ट्रायडंट क्लब रुम – एक दिवसाचे भाडे 18 हजार रुपये

3. ट्रायडंट एक्झिक्युटिव्ह – एक दिवसाचे भाडे 27 हजार रुपये

4. प्रेसिडेन्शिअल रुम – एक दिवसाचे भाडे 3 लाख रुपये

याचाच अर्थ पुढील तीन दिवसांसाठी जर या हॉटेलमधील रुम बुक करण्यात आली तर एका आमदारावरच पक्षाचे लाखो रुपये खर्च होणार आहेत.

ताज हॉटेल: (भाजप आमदारासाठी)

ताज हॉटेलमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या रुम आहेत.

1. लक्झरी रुम – एक दिवसाचे भाडे 21 हजार रुपये

2.लक्झरी ग्रँड- एक दिवसाचे भाडे 28 हजार रुपये

3. ताज क्लब रुम – एक दिवसाचे भाडे 32 हजार रुपये

4. ग्रँड लक्झरी – एक दिवसाचे भाडे 82 हजार रुपये

खरं म्हणजे एका खासदारासाठी लाखो रुपयांची ही उधळण कितपत योग्य आहे असा सवाल आता सामान्य नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

    follow whatsapp