मुंबई : एअरबस टाटाचा प्रकल्प गुजरातला गेल्याच्या आरोप-प्रत्यारोपांवरुन सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. अशातच सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोपांना उत्तर दिली. वेदांता फॉक्सकॉन, एअरबस टाटा आणि इतर प्रकल्प महाविकास आघाडी सरकारच्या काळात बाहेर गेल्याचा आरोप त्यांनी काही कागदपत्र दाखवत केला. यावर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी त्वरित पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीसांचे दावे; आदित्य ठाकरेंचं उत्तर!
-
सिनारामस् पल्प अँड पेपर प्रकल्प
भाजपचा दावा
: सोशल मिडीयावरुन रायगमधील २० हजार कोटींची गुंतवणूक असलेला सिनारामस् पल्प अँड पेपर प्रकल्प युती सरकारच्या काळात आल्याचा दावा करण्यात आला.
आदित्य ठाकरेंचं उत्तर :
देवेंद्र फडणवीस आणि खोके सरकार सांगत आहेत की हा प्रकल्प त्यांनी आणला. पण MIDC च २३ मे २०२२ रोजीच ट्विट सांगत आहे की, दावोसमध्ये या प्रकल्पाचा करार झाला. हा प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळात झालेला आहे.
-
फॉक्सकॉन – वेदांता फॉक्सकॉन :
फॉक्सकॉन राज्यात येणार नाही हे सुभाष देसाईंनीच सांगितलं होतं : देवेंद्र फडणवीस
आज पत्रकार परिषदेमध्ये बोलताना फडणवीस यांनी फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही हे उद्धव ठाकरेंच्या काळात मंत्री असलेले सुभाष देसाईच सांगितले होते, असा दावा केला. ते म्हणाले, जेव्हा हा प्रकल्प गेला तेव्हा अशी का भूमिका घेतली की प्रकल्प आमच्याच काळात गेला? पहिला फेक नेरेटिव्ह हाच तयार करण्यात आला.
अनेक ठिकाणी त्यांनी स्टेटमेंट केलं आहे. यानंतर टाटा एअरबसवरून आम्हाला दोषी धरलं जातं आहे. २३ सप्टेंबर २०२१ ची बातमी आहे. यात गुजरातला प्रोजेक्ट जाणार असल्याचं म्हटलं आहे. एकाच पेपरचं नाही १४ फेब्रुवारी २०२२ ला उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तेव्हा बिझनेस वर्ल्डनेही हीच बातमी दिली आहे. संडे एक्स्प्रेसनेही अशीच बातमी दिली आहे.
फॉक्सकॉन आणि वेदांता फॉक्सकॉन या दोन प्रकल्पांमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे : आदित्य ठाकरे
त्यानंतर पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी देखील तीच बातमी पुन्हा दाखवली. ते म्हणाले, ही बातमी जर देवेंद्र फडणवीस यांनी वाचली असती तर त्यांना लक्षात आलं असतं की देसाई काय म्हणत आहेत? २०१६ ला जो मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम झाला त्यात यासंबंधीची बोलणी झाली होती. त्यावेळी फॉक्सकॉनचा हा MoU साईन झाला होता.
पण देवेंद्र फडणवीस यांनी आणलेला प्रस्ताव हा तामिळनाडूत गेला आहे. फॉक्सकॉन आणि वेदांता फॉक्सकॉन या दोन प्रकल्पांमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प सेमी कंडक्टर चीप साठी होता. मोबाईल फोनसाठी नव्हता. माझी उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कृपया महाराष्ट्राची दिशाभूल करू नका. फॉक्सकॉन कंपनी MoU साईन करून बसली पण त्यांनी ती जागा घेतलीच नाही.
-
टाटा एअरबसच्या प्रकल्पाबद्दल दावे :
देवेंद्र फडणवीस यांच्या मते : महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी सध्याचं वातावरण चांगलं नाही असं अधिकारी म्हणाले.
आदित्य ठाकरे यांच्या मते : केंद्र सरकार जिथं सांगेल तिथं आम्हाला जावं लागेल असं अधिकारी म्हणाले.
ADVERTISEMENT