एकीकडे मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वाढ होत असताना महापालिकेने होळी आणि धुलिवंदन या सणाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी २८ मार्च रोजी साजरा होणारा होळी आणि २९ मार्च रोजी साजरा होणारा धुलिवंदन सण साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे. सार्वजनिक जागांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी यासंदर्भातले आदेश जाहीर केले आहेत.
ADVERTISEMENT
यावेळेस महापालिकेने मी जबाबदार मोहीमेअंतर्गत नागरिकांनी वैयक्तीकरित्या सुद्धा शक्यतो हा सण साजरा करणं टाळावं असं आवाहन महापालिका आयुक्तांनी केलं आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी नियमांचं पालन करुन महापालिका प्रशासनास सहकार्य करावं अशी विनंती आयुक्तांनी केली आहे. नियमांचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.
मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पुढील वर्षभरासाठी गरजेचं – प्रकाश जावडेकर
होळी आणि धुलिवंदनात रंगांची उधळण करताना आणि आपापल्या मित्रांना रंग आणि पाण्यात भिजवताना अनेकदा आपण त्यांच्या संपर्कात येतो. प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणं अत्यंत गरजेचं असल्यामुळे महापालिकेतर्फे हे आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. दरम्यान आजही शहरात ३५१२ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT