ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला NCB ने अटक केली.एनसीबीने मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमधून आर्यन खानला अटक करण्यात आली. आर्यन खाननेही कबुली दिली की चार वर्षांपासून तो ड्रग्ज घेतो आहे. दरम्यान अटक झाला आर्यन खान आणि ट्रोल झाल्या जया बच्चन, याचं कारणही तसंच आहे.
ADVERTISEMENT
काय आहे कारण जया बच्चन ट्रोल होण्याचं?
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू झाल्यानंतर बॉलिवूड आणि ड्रग्जचं कनेक्शनचा अँगल समोर आला आहोता. कंगना रणौतने या सगळ्या मुद्दयाचा वाचा फोडली होती. त्यानंतर NCB ने दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुल प्रीत सिंग, अर्जुन रामपाल यांच्यासह अनेकांची चौकशी झाली होती. त्यावेळीच भाजप खासदार रवि किशन यांनी बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन यांचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला होता. बॉलिवूड हा ड्रग्जचा अड्डा होतो आहे, हे थांबणं आवश्यक आहे. असं म्हणाले होते. त्यानंतर जया बच्चन यांनी उत्तर देताना बॉलिवूडमधे असे काही लोक आहेत जे पोट याच ठिकाणी भरतात आणि ज्या थाळीत जेवतात त्याच थाळीत छेद करतात.
मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानच्या मुलाचं म्हणजेच आर्यन खानचं नाव समोर आल्यानंतर लोक आता जया बच्चन यांना प्रश्न विचारत आहेत आता सांगा की कोणत्या थाळीत छेद आहे? आणखी एका युझरने असं म्हटलं आहे की शाहरूख खानच्या मुलाने केलेल्या गैरकृत्याला थाळीमध्ये छेद म्हणता येईल का? असाही प्रश्न विचारला आहे. एका युझरने असंही म्हटलं आहे की आर्यन खानने जया बच्चन यांच्या थाळीमध्ये छेद केला आहे.
कंगना रणौतला त्यांनी या माध्यमातून टोला लगावला होता. तसंच जया बच्चन यांना कंगना रणौतने खडे बोलही सुनावले होते. जया बच्चन यांनी जेव्हा हे ऐकवलं की काही लोक ज्या थाळीत खातात त्याच थाळीत छेद करतात, त्यावेळी कंगना रणौतने चांगलेच खडे बोल सुनावलं. मी माझी थाळी स्वतः तयार केली आहे असं कठोर उत्तर कंगनाने त्यावेळी दिलं होतं. या दोघींमध्ये झालेला वाद चांगलाच गाजला होता. आता पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून जया बच्चन यांनी नेटकऱ्यांना सुनावलं आहे.
ADVERTISEMENT