कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. बॉलिवूडच्या कलाकारांवरही कोरोनाचं संकट आहे. नुकतंच अभिनेते परेश रावल यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता अभिनेता विक्रांत मसी याचाही कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
ADVERTISEMENT
विक्रांतने स्वतः याबाबत माहिती दिली आहे. यासंदर्भात विक्रांतने ट्विट केलं आहे. तो त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, “शूटींगदरम्यान योग्य ती काळजी घेतऊनही माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलीये. सध्या मी क्वारंटाईन झालो आहे. ज्या व्यक्ती गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आल्या आहेत त्यांनी टेस्ट करुन घ्यावी. मी डॉक्टरांनी दिलेली औषधं घेतोय. माझी प्रकृती ठीक आहे. कोरोनाच्या नियमांचं पालन करा तसंच गरज असल्यास घराबाहेर पडा.”
काही दिवसांपूर्वी परेश रावल तसंच मिलिंद सोमणलाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. तसंच आमिर खान आणि आर माधवनचाही कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. इतकंच नाही तर अभिनेता कार्तिक आर्यनलाही कोरोना झाला असून तो क्वारंटाईनमध्ये आहे.
लसीकरणानंतरही ‘या’ बाॅलिवूड अभिनेत्याला झाली कोरोनाची लागण
क्रिमिनल जस्टीस या बेव सिरीजमधून विक्रांम मसी पुढे आला होता. या सिरीजमधील त्यांचं काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. यासोबत त्याने नुकतंच अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबत छपाक या सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती.
ADVERTISEMENT