गडचिरोली जिल्ह्यात आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईने गाडी घेण्यासाठी पैसे न दिल्यामुळे रागातून मोठ्या भावाने आपल्या धाकट्या दिव्यांग भावाची गळा दाबून हत्या केली आहे. शिवनी या गावात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हेमंत डोये (वय २३) असं आरोपीचं नाव आहे.
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांपासून आरोपी हेमंतचं आपल्या आईशी भांडण होत होतं. मला गाडी घेण्यासाठी पैसे दे यावरुन अनेकदा दोघांमध्ये भांडणं व्हायची. परंतू हेमंतचा छोटा भाऊ भुवन हा दिव्यांग असल्यामुळे त्याच्या उपचारासाठी आई छगनबाई डोये यांनी पैसे वाचवून ठेवले होते. हे सर्व पैसे मुलाच्या उपचारासाठी लागणार असल्यामुळे छगनबाई हेमंतला पैसे देण्यास कायम नकार द्यायच्या.
बालपणीचा मित्रच निघाला नराधम; विवाहित शिक्षिकेवर बलात्कार, नागपूरमधली धक्कादायक घटना
आपल्या भावाच्या वैद्यकीय उपचारासाठी पैसे लागतात म्हणून आपल्याला पैसे मिळत नाहीत अशी भावना हेमंतच्या मनात तयार झाली होती. रविवारी रात्री हाच राग मनात ठेवून हेमंतने पुन्हा आईशी भांडणं केलं. या भांडणात हेमंतने आईला आज मी तुला मारुन टाकतो अशी धमकी दिली. ज्यामुळे घाबरलेल्या छगनबाई या शेजारी झोपायला गेल्या. याच संधीचा फायदा घेत हेमंतने आपल्या लहान भावाची रात्री गळा दाबून हत्या केली.
कल्याण: दुर्गाडी पुलावरून खाडीत उडी मारून प्रेमी युगुलाची आत्महत्या
हा प्रकार लक्षात आल्यानंतर आई छगनबाईने आपल्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी हेमंतला अटक केली आहे. न्यायालयाने हेमंतला मॅजिस्ट्रेट कोठडी सुनावली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पत्नीची हत्या करून आत्महत्या केल्याचा कट फसला, पतीला अटक, पुण्यातली धक्कादायक घटना
ADVERTISEMENT