काँग्रेसला पुन्हा सुरुवात करण्याची गरज- BJP ची साथ सोडलेल्या मायकल लोबोंचा पक्षाला सल्ला

मुंबई तक

• 02:34 PM • 13 Mar 2022

२०१७ साली गोव्यात सत्तास्थापनेसाठी हातात आलेली संधी गमावल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस भाजपला पुन्हा एकदा कडवी लढत देणार असं वाटत होतं. एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात त्रिशंकु परिस्थिती निर्माण होईल असं वाटत होतं. परंतू प्रत्यक्षात भाजपने २० जागा जिंकत अपक्ष आणि मगो पक्षाच्या साथीने सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. निवडणुकीआधी भाजपरा रामराम करत काँग्रेसचा […]

Mumbaitak
follow google news

२०१७ साली गोव्यात सत्तास्थापनेसाठी हातात आलेली संधी गमावल्यानंतर यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस भाजपला पुन्हा एकदा कडवी लढत देणार असं वाटत होतं. एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात त्रिशंकु परिस्थिती निर्माण होईल असं वाटत होतं. परंतू प्रत्यक्षात भाजपने २० जागा जिंकत अपक्ष आणि मगो पक्षाच्या साथीने सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.

हे वाचलं का?

निवडणुकीआधी भाजपरा रामराम करत काँग्रेसचा हात धरलेल्या मायकल लोबो यांनी निवडणुक निकालानंतर पक्षनेतृत्वाला मोलाचा सल्ला दिला आहे.

निवडणुकीत मायकल लोबो यांनी काँग्रेसच्या तिकीटावर कलंगुट मतदारसंघातून विजय मिळवला. काँग्रेसने राज्यात सत्ता आल्यानंतर मायकल लोबो यांना मोठ्या पदाची ऑफर दिली होती. परंतू निकालानंतर सगळं चित्रच बदललं. “मला भाजपमधून बाहेर काढण्यात आलं नव्हतं. मी पक्षात रहावं असंच नेत्यांना वाटत होतं, अखेरपर्यंत प्रयत्न करत रहावे असा त्यांचा सल्लाही होता. परंतू यंदा काँग्रेस सत्तेत येईल असं मला सारखं वाटत होतं. गोव्यातील जनतेमध्ये भाजप सरकारविषयी असलेली नाराजी मला जाणवत होती. लोकांना बदल हवा होता. परंतू त्यांच्या रागाचा योग्य वापर करुन सत्तापरिवर्तन करण्याची संधी आम्ही गमावली, मला याबद्दल खरंच वाईट वाटत आहे.” मायकल लोबो मुंबई तक शी बोलत होते.

बहुमत मिळूनही मुख्यमंत्री काही ठरेना, फडणवीसांच्या एंट्रीने गोव्यात नव्या राजकारणाला सुरुवात?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुक निकालाआधी मायकल लोबो आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते दिगंबर कामत यांच्या बैठक झाली. ज्यात लोबो यांनी कामत यांना मी तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या वाटेत येणार नाही असं आश्वासन दिलं. परंतू याबदल्यात लोबो यांनी उप-मुख्यमंत्रीपदाची मागणी केली. परंतू राज्यात पुन्हा भाजपच सरकार आल्यानंतर मायकल लोबो यांनी शांत बसून न राहता विरोधी पक्ष नेतेपदासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं.

निवडणूकीत भाजपविरुद्ध उतरलेल्या मगो पक्षाने का दिला भाजपला पाठींबा? सुदीन ढवळीकर म्हणतात…

मायकल लोबो यांच्यासोबत भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या कार्यकर्त्यांच्या मते दिगंबर कामत यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी २०१७ साली आली होती परंतू ती त्यांनी गमावली. त्यामुळे पक्षाला बदल हवा असेल तर नवीन नेतृत्वाचा विचार करणं गरजेचं आहे.

कुठलंतरी पद मिळेल या आशेने मी काँग्रेस पक्षाचा मार्ग स्विकारला असं नाही पण जर भविष्यात मला पक्ष नेतृत्वाने एखादी जबाबदारी दिली तर ती मी आनंदाने स्विकारेन असंही लोबो म्हणाले. पक्षांतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार लोबो यांनी आपली ही इच्छा गोव्याचे काँग्रेस प्रभार दिनेश गुंडु राव यांच्याकडे बोलून दाखवली आहे.

निवडणुक निकालानंतर तुम्ही पुन्हा भाजपत जाण्याचा विचार करत आहात का असा प्रश्न विचारला असता लोबोंनी नकारार्थी उत्तर दिलं. “मी असं केलं तर ती माझ्या मतदारसंघातील जनतेशी प्रतारणा ठरेल. मी आता असं करणार नाही. मी काँग्रेसचा राजीनामा देऊन पुन्हा भाजपत जाऊ शकत नाही. मला अजुनही अनेक फोन येतात, त्या पक्षात माझे अनेक मित्र आहेत पण मी काँग्रेसमध्येच राहणार असून या पक्षासाठी काम करणार आहे”, असं लोबो म्हणाले.

गोव्यात काँग्रेसला हरवण्यासाठी ममता बॅनर्जींची भाजपला मदत – अधीर रंजन चौधरींचा आरोप

यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला जिंकायची चांगली संधी आलेली होती परंतू लोकांचं मन आपल्या बाजूने वळवण्यात पक्ष कमी पडला. काँग्रेस पक्षाला सध्या तरुण नेतृत्वाची गरज आहे. पक्षाला प्रत्येक गावात नेतृत्वामध्ये बदल करावा लागेल. निवडणुका लढायच्या आधी त्या कशा लढल्या जाव्यात याची रणनिती आखली जाणं गरजेचं असतं. मी हे मनोहरभाईंकडून शिकलो. २००५ पासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत मी सोबत होतो. विरोधीपक्ष नेते असतानाही मनोहरभाई गोव्यात प्रत्येक मतदारसंघात जायचे. त्यामुळे काँग्रेसला जर अपेक्षित निकाल हवा असेल तर तरुण नेतृत्वाला संधी देणं गरजेचं आहे असं लोबो यांनी स्पष्ट केलं.

पक्षाला पुन्हा उभारणी देण्यासाठी लोबो यांनी एक रणनितीही तयार केली आहे. “जास्तीत जास्त तरुण नेतृत्वाला संधी देण्यात यावी. सुरुवातीला थेट ४० मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत करायची गरज नाही. पहिल्यांदा मोजून २६ मतदारसंघावर लक्ष केंद्रीत करता येईल. या मतदारसंघात हळुहळु पावलं टाकत पक्ष बांधणी करावी लागणार आहे. हे काम सोपं नाही, यात खूप संयमाची गरज लागणार आहे. पण यासाठी मी नेहमी तयार आहे.” जर आपल्याला पक्षाने योग्य जबाबदारी आणि अधिकार दिले तर पुढील १० महिन्यांमध्ये आपण सरकारला चेकमेट करु शकतो असा विश्वास लोबो यांनी बोलून दाखवला.

विरोधीपक्ष नेता हे काही शोभेचं पद नाहीये. सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही या पदाच्या माध्यमातून खूप काही करु शकता. मी आता कोणत्याही पदासाठी लालची होत नाहीये. पण देवाच्या कृपेने मी आता हे काम करु शकतो आणि जनतेच्या मनात काँग्रेस पक्षाविषयी चांगली भावना तयार करण्यासाठी मदत करु शकतो. गोष्टी एका रात्रीत बदलत नाहीत हे पक्षनेतृत्वाने समजून घ्यायला हवं. तुम्हाला योग्य माणसांवर आणि नेत्यांवर वेळ खर्च करुन त्यांच्यात गुंतवणुक करावी लागते. उत्पल पर्रिकरांनी गोव्यात काँग्रेसच्या तिकीटावर जर निवडणुक लढवली असती तर ते जिंकले असते असंही लोबो म्हणाले.

Goa Result : मीच मुख्यमंत्री होणार ! डॉ. प्रमोद सावंत यांना आत्मविश्वास

    follow whatsapp