काँग्रेसचा आक्षेपच खोडसाळपणाचा आहे: गिरीश महाजन

मुंबई तक

• 02:07 PM • 20 Jun 2022

मुंबई: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने भाजपच्या लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांची मतं बाद ठरविण्यात यासाठी आक्षेप घेण्यात आला होता. याबाबत भाजपच्या गिरीश महाजन यांनी संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसचा आक्षेपच खोडसाळपणा आहे. तसंच काँग्रेसने जो आक्षेप घेतला आहे तो खरोखरच हास्यास्पद असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. पाहा गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले: ‘मतदानासाठी […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसने भाजपच्या लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांची मतं बाद ठरविण्यात यासाठी आक्षेप घेण्यात आला होता. याबाबत भाजपच्या गिरीश महाजन यांनी संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसचा आक्षेपच खोडसाळपणा आहे. तसंच काँग्रेसने जो आक्षेप घेतला आहे तो खरोखरच हास्यास्पद असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

पाहा गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले:

‘मतदानासाठी रितसर परवानगी घेण्यात आली आहे. राज्यसभेची निवडणूक झाली तेव्हा देखील याच पद्धतीने मतदान केलं होतं या लोकांनी. तीच पद्धत आता देखील वापरण्यात आली आहे. काँग्रेसने घेतलेला आक्षेप हा अतिशय बालिश आणि खोडसाळपणाचा आहे. जाणीवपूर्वक मतमोजणीला विलंब व्हावा यासाठी त्यांनी केलेला उपद्रव आहे. मला असं वाटतं हा काही आक्षेप असूच शकत नाही. तो फेटाळलाच जाणार आहे.’ असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.

‘सहाय्यकाविषयी काँग्रेसने घेतलेला आक्षेप हा चुकीचा आणि हास्यास्पद आहे. जेव्हा मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप मतदानासाठी आले तेव्हा त्यांच्यासोबत सहाय्यक होते. त्यावेळी कुठलाही आक्षेप कुणीच घेतला नाही. आता जे करण्यात आलं आहे तो हास्यास्पद आक्षेप आहे. म्हणजे आमदार रुग्ण जो आहे तो खाली आहे त्याला वर जाऊन मतदान करायचं आहे. तर तो काय खालून ओरडून सांगणार का.. की, 1 नंबर याला दे.. 2 नंबर त्याला दे.. हे कसं काय शक्य होणार? त्यामुळे मतदानासाठी सहाय्यक योग्यच असावा.’ असंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

‘कोणत्याही निवडणुकीत मतदानासाठी 18 वर्षांच्या वरीलच सहाय्यक दिले जातात. असा कोणता नियम आहे हे त्यांनी दाखवावं. खरं म्हणजे यामध्ये बाजू मांडण्याची गरजच नाही. एका मिनिटात त्यांचा आक्षेप फेटाळला जाईल. गरज असेल तर आम्ही आमची बाजू मांडू. कारण तीन दिवस आधी रितसर पत्र देऊन परवानगी घेतली आहे RO ची. त्यामुळे या आक्षेपाला काही आधारच नाही.’ असं म्हणत गिरीश महाजन यांनी काँग्रेसचा आक्षेपच चुकीचा असल्याचं म्हटलं आहे.

विधान परिषदेचा निकाल लटकला, राज्यसभा
निवडणुकीप्रमाणेच हाय व्होल्टेज ड्रामा

‘हे कुठेही गेले जगाच्या कोपऱ्यात हा आक्षेप घेऊन तरी तो फेटाळलाच जाणार आहे. कारण आमच्याकडे लेखी स्वरुपात परवानगी आहे.’ असं गिरीश महाजन म्हणाले.

    follow whatsapp