सोलापूर : MLA राजेंद्र राऊतांच्या मुलांच्या लग्नात कोरोनाचे नियम धाब्यावर, हजारोंची गर्दी

मुंबई तक

• 08:57 AM • 27 Jul 2021

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही सामान्य जनतेसाठी लग्नसोहळे व इतर समारंभांना सरकारने नियम आखून दिले आहेत. ठराविक वेळेत ५० जणांच्या उपस्थितीत लग्न व इतर सोहळे पार पाडण्याचा नियम आखून देण्यात आला आहे. परंतू राज्यातील नेत्यांच्या घरात जेव्हा लग्नकार्य किंवा इतर सोहळे असतात तेव्हा या नियमांना केराची टोपली दाखवली जाते. सोलापूरमधील बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही सामान्य जनतेसाठी लग्नसोहळे व इतर समारंभांना सरकारने नियम आखून दिले आहेत. ठराविक वेळेत ५० जणांच्या उपस्थितीत लग्न व इतर सोहळे पार पाडण्याचा नियम आखून देण्यात आला आहे. परंतू राज्यातील नेत्यांच्या घरात जेव्हा लग्नकार्य किंवा इतर सोहळे असतात तेव्हा या नियमांना केराची टोपली दाखवली जाते. सोलापूरमधील बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांच्या दोन्ही मुलांच्या लग्नात हेच चित्र दिसून आलं.

हे वाचलं का?

आमदार राजेंद्र राऊत यांचे पुत्र रणजित आणि रणवीर यांचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्यात अनेक भाजप नेत्यांनी उपस्थिती लावली होती. परंतू कोरोनाविषयक नियमांचा या लग्नसोहळ्यात विसर पडला होता. हजारोंच्या उपस्थित पार पडलेल्या या सोहळ्या सोशल डिस्टन्सिंगचं भान कोणत्याही नेत्याला राहिलेलं दिसलं नाही.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे आमदार राम सातपुते , सचिन कल्याणशेट्टी , सुभाष देशमुख , प्रशांत परिचारक , समाधान अवताडे, खासदार रणजित नाईक-निंबाळकर, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी देखील लग्नसोहळ्यासाठी उपस्थित होते.

मात्र लग्न सोहळ्यासाठी परवानगी मागणाऱ्या योगेश पवार या आयोजकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. योगेश पवार हे राऊत यांच्या लक्ष्मी सोपान बाजार समितीत काम करतात. त्यांनी लग्न आयोजनाची परवानगी पोलिसांकडे मागितली होती. मात्र सर्वाना नियम कायदा सारखाच यामुळे आमदार राजेंद्र राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

    follow whatsapp