आखाडा परिषदेचे नरेंद्र गिरी महाराज यांच्या अकस्मात निधनाने आम्हाला धक्काच बसला आहे. या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे. स्वामीजी गेले आहेत यावर आमचा विश्वासच बसत नाही. या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकार आणि भारत सरकारने चौकशी करावी. स्वामी नरेंद्र गिरी महाराज यांच्या संशयास्पद मृत्यू मध्ये ज्या कुणाचा हात असेल त्यांना कठोरातली कठोर शिक्षा दिली जावी अशी मागणी कैलासमठाचे सेवक समीनानंद सरस्वती यांनी मुंबई तकला दिली.
ADVERTISEMENT
स्वामी नरेंद्र गिरी यांचं निधन ही अत्यंत दुःखद घटना आहे. त्यां वाय दर्जाची सुरक्षा प्रदान होती. तरीही अशी घटना घडली या घटनेची सर्वोच्च चौकशी व्हावी, सीबीआयतर्फे चौकशी करण्यात यावी अशी मी विनंती करतो. खोटेपणा करणारे जे साधू आहेत जसे की आसाराम, राम रहिम, रामपाल, राधे माँ यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय स्वामींनी घेतला होता त्यावेळीच त्यांनी माझी हत्या होईल अशी शक्यता वर्तवली होती. या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया महंत श्रीमंडलाचार्य अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी दिली.
काय आहे कथित सुसाईडनोटमध्ये?
प्रयागराज पोलिसांनी हा दावा केला आहे की महंत नरेंद्र गिरी महाराजांच्या खोलीतून जी सुसाईड नोट मिळाली त्यामध्ये त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्यासहीत काही इतर नावं आहेत. एवढंच नाही तर यामध्ये असं लिहिलं गेलं आहे की नरेंद्र गिरी का दुःखी होते? त्यांनी आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय का घेतला हे देखील या सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरेंद्र गिरी महाराजांनी लिहिलेली सुसाईड नोट ही सात ते आठ पानांची आहे.
आयजी प्रयागराज के पी सिंह यांनी असं म्हटलं आहे की सुसाईड नोट एखाद्या इच्छापत्राप्रमाणे लिहिण्यात आली आहे. यामध्ये आनंद गिरी यांच्यासहीत इतर काही जणांची नावं आहेत.या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी काय म्हटलं आहे?
‘मला असं वाटतं की पालघरमध्ये साधूंचं हत्याकांड हा विषयही गंभीर होता. त्या प्रकरणाचा २० सप्टेंबरला घडलेल्या महंत नरेंद्र गिरी प्रकरणाशी संबंध आहे असं मला वाटतं आहे. मला या प्रकरणी फक्त शक्यता वाटत नाही तर खात्री वाटते आहे की या दोन्ही प्रकरणांचा एकमेकांशी काहीतरी संबंध आहे.’
ADVERTISEMENT