पालघर पोलिसांनी एका फसवणूक करणाऱ्या एका चालाख बहाद्दराला अटक केली. दिल्ली गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचं सांगून महिलांना लग्नासाठी फसवणाऱ्या एका धूर्त गुन्हेगाराच्या पोलिसांना मुसक्या आवळल्या. त्यानं एका महिलेवर बलात्कारही केलाय. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अहमदाबादमधून अटक केली.
ADVERTISEMENT
आरोपीची ओळख हिमांशू योगेशभाई पांचाळ अशी असून, तो 26 वर्षांचा आहे. हिमांशूने एका मॅट्रिमोनियल साईटद्वारे महिलांशी मैत्री केली आणि स्वतःची ओळख दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलचा अधिकारी म्हणून करून दिली. तो मुलींना लग्नाचे स्वप्न दाखवून त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि नंतर भेटीच्या बहाण्यानं त्यांना हॉटेल्स आणि लॉजमध्ये घेऊन जायचा. तिथे नेऊन त्यांचं शारीरिक आणि मानसिक शोषण करायचा.
हे ही वाचा >>Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये शिवजयंतीच्या रॅलीमध्ये कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचे फोटो, नेमकं चाललंय तरी काय?
पालघरमधील वालीव पोलीस ठाण्यात एका महिलेनं हिमांशूविरुद्ध तक्रार दाखल केली होती. महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिला लग्नाचं आमिष दाखवलं आणि अनेक वेळा हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने महिलेला बनावट हिरा प्रभाव टाकण्याचाही प्रयत्न केला.
पोलीस तपासात असं दिसून आलं की, हिमांशूने अशा प्रकारे सुमारे डझनभर महिलांची फसवणूक केली होती. आरोपीची पद्धत एखाद्या सिनेमासारखी होती. तो आधी महिलांशी मैत्री करायचा, त्यांच्याशी संबंध निर्माण करायचा, नंतर त्यांना फसवून गायब व्हायचा. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी हिमांशूविरुद्ध गुन्हा दाखल केला.
हे ही वाचा >>TESLA Project in India : एसयुव्ही Y मॉडेलसोबत टेस्ला भारतात करणार धमाकेदार एन्ट्री, कंपनीत भरती सुरू?
पोलिसांनी तपास करत आरोपीचा माग काढला आणि अखेर त्याला अहमदाबाद येथून अटक केली. सध्या, हिमांशूविरुद्ध आणखी किती तक्रारी दाखल आहेत आणि त्याने अशा प्रकारे किती महिलांना बळी पाडलं, याचा तपास पोलीस करत आहेत. एकूणच, हे प्रकरण पाहताना मॅट्रिमोनियल साइट्सवर अनोळखी लोकांशी मैत्री करण्यापूर्वी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे असं दिसतंय.
ADVERTISEMENT
