मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्लीत जाणार होते. मंत्रिमंडळ विस्तार मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन आल्यानंतर केला जाईल अशी चर्चा होती. मात्र आता आज होणारा एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द झाला आहे. आत्ताच ही माहिती हाती येते आहे.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा रद्द
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाला एक महिना झाला आहे. तसंच राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आत्तापर्यंत अनेकदा दिल्लीत जाऊन आले आहेत. मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मात्र आज मुख्यमंत्री दिल्लीत जातील आणि मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख आणतील अशी शक्यता होती. मात्र आता त्यांचा दौराच रद्द झाला आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर स्थिर आणि सुलभ सरकारचं आश्वासन दिलं होतं, मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे जमिनीवरचं वास्तव वेगळं आहे हेच दिसतं आहे. शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही अडचणीत असतानाच आता नव्याने स्थापन झालेल्या सरकारला याचा फटका बसला आहे.
मंत्रालयात अधिकारी कचरत आहेत निर्णय घ्यायला
प्रवीण पालांडे हे बुलढाणा जिल्ह्यातील तरूण वकील आहेत. ते दारिद्र्य रेषेखालील योजनेच्या अंतर्गत दिव्यांगासाठी असलेल्या घराच्या शोधात आहे. गेल्या वर्षभरापासून ते गृहनिर्माण विभागात पाठपुरावा करत आहात. मात्र अद्याप विस्तार झालेला नाही, असं उत्तर त्यांना आता दिलं गेलं आहे. हे झालं एक उदाहरण.
दुसरीकडे मंत्री कार्यालयात नसताना कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्यास अधिकारी कचरत आहेत. त्यामुळे मंत्रालयातल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयात गर्दी होते आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहावा दौरा होणार होता. मात्र हा दौरा आता रद्द झाला आहे.
दुसरीकडे लोकांचे प्रश्न प्रलंबित असताना शिंदे गटातले आमदार तसंच भाजपचे आमदारही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयात रांगा लावताना दिसतं आहे. मतदारसंघातील कामं करण्याबाबत ते विचारत आहेत. तसंच मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने पावसाळी अधिवेशनाही लांबणीवर गेलं आहे. विस्ताराच्या तारखेचीही माहिती अद्याप सरकार देऊ शकलेलं नाही. प्रश्न आला की लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल हे सांगितलं जातं आहे. मात्र अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.
ADVERTISEMENT