Nashik Oxygen Leak : 22 मृत्यूंमुळे महाराष्ट्र शोकमग्न आहे-मुख्यमंत्री

मुंबई तक

• 11:31 AM • 21 Apr 2021

नाशिकमध्ये ऑक्सिजन लीक झाल्याने 22 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्र शोकमग्न आहे असं म्हणत त्यांनी याबाबत एक पत्र ट्विट केलं आहे. या पत्रात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. नाशिकच्या झाकीर हुसैन रूग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याने 22 जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले. या घटनेबद्दल सगळ्या […]

Mumbaitak
follow google news

नाशिकमध्ये ऑक्सिजन लीक झाल्याने 22 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्र शोकमग्न आहे असं म्हणत त्यांनी याबाबत एक पत्र ट्विट केलं आहे. या पत्रात त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. नाशिकच्या झाकीर हुसैन रूग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याने 22 जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले. या घटनेबद्दल सगळ्या राज्यात हळहळ व्यक्त होते आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्र शोकमग्न आहे- मुख्यमंत्री

‘कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरु आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दु:ख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करती असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वत:ला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करु? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरीह मृतांच्या नातेवाईकांचे दु:ख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच.

या दुर्घटनेस जबाबदार असेल त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करु नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!’ अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत.’ असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे देखील त्यांनी जाहीर केलं आहे.

नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला, या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन जावे लागणार आहे हे शिकवणारी आहे. आज गेल्या वर्षभरापासून आपण कोव्हिडच्या लाटेला सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेत, अशा परिस्थितीत असा निष्काळजीपणाने जीव जाणे मनाला अतिशय बोचणारे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, केवळ शोक सांत्वना करुन चालणार नाही. अशा घटना भविष्यात घडू नये आरोग्य यंत्रणांचे मनोबल ज्यामुळे खच्ची होईल अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी प्रशासनाने काळजीपूर्वी आणि डोळ्यात तेल घालून काम केलं पाहिजे.

    follow whatsapp