कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती, प्रकृती कशी आहे तुम्हीच बघा!

मुंबई तक

• 03:09 PM • 23 Dec 2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कॅबिनेटच्या बैठकीत ऑनलाईन सहभागी झाले आहेत. मुंबई तकच्या हाती हा व्हीडिओ लागला आहे. लाईव्ह मिटिंगमधला हा व्हीडिओ आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या व्हीडिओचा फोटो ट्विट केला आहे. सुमारे एक महिन्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कसे आहेत हा प्रश्न महाराष्ट्राला पडला होता. आता त्यांची पहिली झलक ऑनलाईन पद्धतीने दिसली आहे. मुख्यमंत्री […]

Mumbaitak
follow google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कॅबिनेटच्या बैठकीत ऑनलाईन सहभागी झाले आहेत. मुंबई तकच्या हाती हा व्हीडिओ लागला आहे. लाईव्ह मिटिंगमधला हा व्हीडिओ आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या व्हीडिओचा फोटो ट्विट केला आहे. सुमारे एक महिन्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कसे आहेत हा प्रश्न महाराष्ट्राला पडला होता. आता त्यांची पहिली झलक ऑनलाईन पद्धतीने दिसली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चहापानाला येणार होते असं नक्की झालं होतं. मात्र ते आले नाहीत. दोन दिवस अधिवेशन सुरू आहे त्यालाही मुख्यमंत्री उपस्थित नव्हते. आता त्यांची पहिली झलक ऑनलाईन पद्धतीने समोर आली आहे.

हे वाचलं का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी प्रश्न आणि विविध अंदाज लावले जात असताना, तर्क लढवले जात असताना महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कॅबिनेटच्या बैठकीत ऑनलाईन उपस्थित होते. तसंच रात्री दहा वाजता ते कोव्हिड टास्क फोर्सची बैठक घेणार आहेत.

१० नोव्हेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एच एन रिलायन्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना 21 दिवसांनी म्हणजेच डिसेंबर महिन्यात डिस्चार्ज देण्यात आला. अधिवेशनात ते कधी येणार? हा प्रश्न विचारला जात होता. दोन दिवस विरोधक याबाबत प्रश्न विचारत विविध तर्कही लावत होते. अशात आज जितेंद्र आव्हाड यांनी एक फोटो ट्विट केला त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेटच्या बैठकीत उपस्थिती लावल्याचं दिसतं आहे.

उद्धव ठाकरे CM राहणार Sharad Pawar भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी का केला खुलासा?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सर्व्हायकल स्पॉडिंलायटिसचं ऑपरेशन झालं. त्यांना फिजिओथेरेपी सुरू आहे. अशात मुख्यमंत्री अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी येतील अशीही चर्चा होती. पण तसं झालं नाही. ज्यानंतर विविध चर्चा सुरू झाल्या. भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करणार आहेत असं ऐकलं, जे काही असेल ते लवकर जाहीर करा. महाराष्ट्राला मुख्यमंत्रीच नाही अशी स्थिती आहे. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही असं वक्तव्य केलं की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कार्यभार रश्मी ठाकरेंकडे द्यावा किंवा आदित्य ठाकरेंकडे द्यावा. त्यांच्यावर विश्वास नाही का?

    follow whatsapp