मुंबईच्या ‘बत्ती गुल’ प्रकरणामागे चीनचा हात

मुंबई तक

• 11:48 AM • 01 Mar 2021

गेल्या वर्षी मुंबईत 12 ऑक्टोबरला वीज गायब झाली होती आणि मुंबईच्या लोकल यंत्रणेपासून ते हॉस्पिटलमधले व्हेंटिलेटर्सपर्यंत अनेक यंत्रणा कोलमडून पडण्याचा धोका होता. मुंबईच्या या ‘बत्ती गुल’ प्रकरणावर आता थेट अमेरिकेतल्य़ा न्यूयॉर्क टाईम्सने सविस्तर वृत्त प्रसिध्द केले आहे आणि या घटनेमागे चीनचा हात असल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. हे वृत्त प्रसिध्द करताना न्यूयॉर्क टाईम्सने इंडिय़ा टुडेचा […]

Mumbaitak
follow google news

गेल्या वर्षी मुंबईत 12 ऑक्टोबरला वीज गायब झाली होती आणि मुंबईच्या लोकल यंत्रणेपासून ते हॉस्पिटलमधले व्हेंटिलेटर्सपर्यंत अनेक यंत्रणा कोलमडून पडण्याचा धोका होता. मुंबईच्या या ‘बत्ती गुल’ प्रकरणावर आता थेट अमेरिकेतल्य़ा न्यूयॉर्क टाईम्सने सविस्तर वृत्त प्रसिध्द केले आहे आणि या घटनेमागे चीनचा हात असल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे. हे वृत्त प्रसिध्द करताना न्यूयॉर्क टाईम्सने इंडिय़ा टुडेचा दाखली दिला होता.

हे वाचलं का?

गेल्या वर्षी 12 ऑक्टोबरला मुंबई शहरात वीज गायब झाली होती. हा खंडित झालेला वीजपुरवठा साधारण 10 ते 12 तासानंतर पूर्ववत झाला, पण वीजपुरवठा खंडित होण्य़ाचा हा प्रकार मुंबईत गेल्या कित्येक दशकात झाला नव्हता तेव्हा या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने दिले होते.

न्यूयॉर्क टाईम्सच्या या वृत्तानुसार मुंबईतला वीज गायब होण्याचा प्रकारामागे चायनीज हॅकर्सचा हात असल्याची माहिती दिली आहे. भारतात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जे सॉफ्टवेअर वापरले जाते त्या सॉफ्टवेअरमध्ये चीन हॅकर्सकडून मालवेअर (व्हायरस) सोडण्यात आले त्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्य़ाचा प्रकार घडला.

याच सुमारास भारताच्या लडाख प्रांतामध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीन संघर्ष शिगेला पोचला होता. याच पार्श्वभूमीवर हॅकिंगचा प्रकार चीनकडून करण्यात आला आणि चीनकडून भारताला हा एक प्रकारे देण्यात आलेला इशारा होती अशी माहिती न्यूयॉर्क टाईम्समध्य़े देण्यात आली आहे.

वीज पुरवठा यंत्रणेवर हल्ला करणाऱ्या मालवेअरचा शोध ‘रेकॉर्डेड फ्युचर’ या अमेरिकन कंपनीने घेतला. या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार अनेक मालवेअर सायबर अटॅक करण्यासाठी सोडण्यात आले होते पण यापैकी काही मालवेअर अ‍ॅक्टीव्ह झाले नव्हते त्यामुळ हा सायबर हल्ला पूर्ण यशस्वी झाला नव्हता. जर हा हल्ला झाला असता तर मुंबईवर अनर्थ ओढावला असता.

रेकॉर्डेड फ्युचर कंपनीला या मालवेअरची संपुर्ण माहिती काढण्यात यश आले नाही कारण या मालवेअरला रिस्ट्रिटेड कोडिंग होते. त्यामुळे या कंपनीने भारतीय अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती दिल्याचे न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तात म्हटलं आहे.

रेड इको ही चीनी कंपनी या सायबर ह्ल्लाच्या मागे असल्याची माहिती संबंधित कंपनीच्या ब्लॉगवरुन मिळत आहे. रेकॉर्डेड फ्युचरचे अधिकारी स्टुअर्ट सोलेमॉन यांच्या माहितीनुसार, रेड इको कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतामध्ये वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेमधील एक डझनहून अधिक ठिकाणी घुसखोरी केली.

    follow whatsapp