एरवी सोशल मीडियावर चर्चेचा विषय असणारी उर्फी जावेदची वेशभूषा आता महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचा मुद्दा बनलीये. उर्फी जावेदच्या वेशभूषेवरून भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ सातत्यानं टीका करताहेत. तर त्यावर उर्फी जावेदकडून प्रत्युत्तर दिलं जातंय. उर्फी जावेद-चित्रा वाघांचा वाद आता राज्याच्या महिला आयोगापर्यंत जाऊन पोहोचलाय. आणि त्यामुळेच राष्ट्रवादीच्या नेत्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर चित्रा वाघांनी निशाणा साधलाय.
ADVERTISEMENT
उर्फी जावेदच्या फॅशनची आणि बोल्ड फोटोंची चर्चा सोशल मीडियावर नेहमीचीच झालीये. पण, भाजपच्या नेत्या चित्रा वाघांनी उर्फीच्या बोल्डनेसवरच बोट ठेवलंय. चित्रा वाघांनी उर्फीच्या वेशभूषेला नंगटपणा म्हणत अटकेची मागणी केली. यावरून शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारेंनी सुषमा अंधारेंवर निशाणा साधला. सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर दिल्यानंतर चित्रा वाघांनी आता राज्य महिला आयोगाला सवाल केलेत.
चित्रा वाघांचे राज्य महिला आयोगाला सवाल
चित्रा वाघांनी ट्विट केलंय. त्या म्हणतात, “भाषा नको तर कृती हवी.. सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का? मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे. महिला आयोग समर्थन करतंय का?”, असा प्रश्न चित्रा वाघांनी विचारला आहे.
‘संजय आठवतोय का?’, उर्फी जावेदनं ठेवलं चित्रा वाघ यांच्या वर्मावर बोट
चित्रा वाघ पुढे म्हणतात, “भर रस्त्यात अर्धनग्न महिला खुलेआम फिरतीये. महिला आयोगानं स्वतः याची दखल घेत का नाही विचारला जाब? विरोध उर्फी या व्यक्तीला नाही तर सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं या वृत्तीला आहे. आणि हो… कायदा कायद्याचं काम करणारच, महिला आयोग काही करणार की नाही?”, असा सवाल चित्रा वाघांनी महिला आयोगाला केलं आहे.
महिला आयोगाच्या माध्यमांतून चित्रा वाघांचा रुपाली चाकणकरांवर निशाणा
चित्रा वाघ यांनी कुठेही रुपाली चाकणकर यांचं नाव घेतलेलं नसलं, तरी त्यांच्या रडारवर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर असल्याची चर्चा आहे. रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजप प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी रुपाली चाकणकरांकडे सोपवण्यात आली होती. त्यानंतर आघाडी सरकारच्या काळात रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं. उर्फीच्या वादामुळे राष्ट्रवादीच्या आजी-माजी महिला नेत्या समोरासमोर आल्या आहेत.
‘जेलमध्ये जाण्यास तयार, आधी…’, उर्फी जावेदचं चित्रा वाघांना आव्हान
चित्रा वाघांनी सुषमा अंधारेंना काय दिलं होतं उत्तर?
“आपल्या कामाची गरज म्हणून कोणाचा पेहराव तसा असेल तर तो झाला कामाचा भाग; यावर माझा किंवा कोणाचाही आक्षेप असायचं कारण नाही, पण जिथे आपण समाजात वावरतो, सार्वजनिक ठिकाणी भर वस्ती आणि रस्त्यावर खुल्या वातावरणात आपला पेहराव व्यवस्थित राखणं हे सामाजिक भान आहे. तो जर राखला जात नसेल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये?”, असा उलट सवाल चित्रा वाघांनी सुषमा अंधारेंना केला होता.
“व्यक्तीस्वातंत्र्याचा सन्मान नं राखता, त्याचा अतिरेक करणाऱ्यांना रोखणं, हा ही धर्म नाही का? लेकी-बाळी तर आपल्या प्रत्येकाच्याच घरी आहेत, त्यांच्यासमोर असे आदर्श असावेत का? स्री शिक्षित व्हाही, सक्षम व्हावी, यासाठी लढा देणाऱ्या सावित्रीमाईंनाही स्वैराचाराला प्रोत्साहन देणाऱ्या अश्या लेकी अभिप्रेत होत्या का? जिथे समाजस्वास्थ्य महत्वाचं, तिथे राजकारण करण्याची गरज आहे का?”, असंही चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.
‘तात्काळ हिला बेड्या ठोका’; चित्रा वाघ चिडल्या, ऊर्फी जावेदही भडकली
“माझं आवाहन आहे की हे असे उपदव्याप रोखण्यासाठी एक होऊ या. छत्रपतींचा आदर्श,सावित्रीचे संस्कार जपू या..खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरणाचा जागर करू या.. हा विषय वाद अथवा राजकारणाचा नक्कीच नाही तर सामाजिक स्वास्थ्य जपण्याचा आहे,ही फक्त माझीच नाही तर आपली सगळ्यांचीच जबाबदारी नाही का? व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार कदापी खपवून घेतला जाणार नाहीच समर्थन करणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडो एव्हढी सदिच्छा आहे”, अशी भूमिका चित्रा वाघ यांनी सुषमा अंधारेंच्या टीकेनंतर मांडली होती.
ADVERTISEMENT