दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर: जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणासाठी तात्काळ खुला झाला पाहिजे आणि जयप्रभा स्टुडिओमधील इमारतीसह खुली जागा आरक्षित राहावी तसेच चित्रीकरणा व्यतिरिक्त त्याचा कोणताही व्यवसायिक वापर होऊ नये. अशी मागणी करत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळच्या आजपासून बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे.
ADVERTISEMENT
कोल्हापूर महानगरपालिकाने स्टुडिओचा वापर व्यावसायिक होऊ नये याची काळजी घ्यावी, त्यासाठी कुणी परवानगी मागितल्यास त्याला नकार द्यावा. अशीबी यावेळी मागणी करण्यात आली आहे.
जयप्रभा स्टुडिओचे जतन होण्याकरीता शासनाने व महापालिका प्रशासनाने लक्ष घालावे. शालिनी स्टुडिओ व जयप्रभा स्टुडिओची भूमी बिल्डरांच्या घशात जावू देणार नाही. असा एल्गारच यावेळी महामंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.
जोपर्यंत याचा लेखी आदेश निघत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहील. असं म्हणत कोल्हापूरवासियांनी जयप्रभा स्टुडिओविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या काळात जयप्रभा स्टुडिओची विक्री सहा कोटी पन्नास लाख रुपयांनी झाली होती. कोल्हापुरातील शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या दोन मुलांनी व इतर सात भागीदारांनी हा व्यवहार केला होता.
हा प्रकार कालच कोल्हापूरकरांना समजला. ज्यामुळे आता या सगळ्या प्रकाराविषयी कोल्हापुरात संताप व्यक्त केला जात आहे. मागील दहा ते पंधरा वर्ष हा स्टुडिओ वाचवण्यासाठी कोल्हापूरकरांनी आंदोलन छेडलं होतं.
भालजी पेंढारकर यांच्याकडून 1959 आली साठ रुपयात हा स्टुडिओ खरेदी केलेला होता. या स्टुडिओच्या 13 एकर जागेपैकी दहा एकर जागा लतादीदींनी 2008 साली एका व्यवसाय बिल्डरला विकली होती. तर यातील उरलेली तीन एकर जागा दोन वर्षापूर्वीच विकली होती. त्यामुळे आता या संपूर्ण जयप्रभा स्टुडिओसाठी कोल्हापूरवासियांना बेमुदत उपोषणाचं हत्यार उपसलं आहे.
लता मंगेशकरांच्या मालकीच्या जयप्रभा स्टुडिओची 2 वर्षांपूर्वीच शिवसेना नेत्याच्या मुलाकडून खरेदी, कोल्हापूकर संतापले!
नेमकं प्रकरण काय?
दरम्यान, कोल्हापुरात कला क्षेत्रासाठी शाहू महाराज संस्थानकडून ही जागा भालजी पेंढारकर यांना देण्यात आली होती. त्याठिकाणी जयप्रभा स्टुडिओची रचना करून भालजी पेंढारकर यांनी अनेक चित्रपटांचं शूटिंग केलं होतं. पण नंतर ती जागा त्यांनी लता मंगेशकर यांना विकली होती. कोल्हापूरमध्ये कलावंत घडावेत या हेतून या जागेत हा स्टुडिओ उभारला गेला होता.
जयप्रभा स्टुडिओ वाचावा म्हणून एकीकडे कोल्हापूरकर गेली 10 ते 12 वर्षे आंदोलन करत आहेत. मात्र कोल्हापूरकरांना अंधारातच ठेवून राजकीय बड्या नेत्याच्या मुलांनी हा जयप्रभा स्टुडिओ 6 कोटी 50 लाखाचा व्यवहार करून आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती आज समोर आली आहे.
आठ दिवसांपूर्वीच लता मंगेशकर यांचं निधन झालं त्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील व मुख्यमंत्री स्तरावर लता मंगेशकर यांचे स्मारक बनावं याची चर्चा सुरू होती. यासाठी जयप्रभा स्टुडिओची चाचपणी करण्यात येत असतानाच हा स्टुडिओ 15 फेब्रुवारी 2020 रोजी विक्री झाल्याचे स्पष्ट झालं. त्यामुळेच आता उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT