कोरोनाची सुरूवात जेव्हापासून झाली तेव्हापासून २ एप्रिल २०२१ पर्यंत मुंबईत मास्क न लावणाऱ्या व्यक्तींकडून ४९ कोटी १५ लाख ४६ हजार ८०० रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे. सार्वजनिक जागेवर मास्क न लावता फिरणाऱ्या मुंबईकरांकडून हा दंड घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या परीक्षेत्रात जे लोक मास्क न लावता फिरत होते त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
मुंबई लोकल बंद होऊ देणार नाही – विजय वडेट्टीवार
मुंबई महापालिकेने याबद्दल काय म्हटलं आहे?
मास्क लावणाऱ्यांचा आकडा वाढला तर रुग्णांची संख्या निश्चित कमी होईल.मास्क न लावणाऱ्या मुंबईकर नागरिकांकडून २ एप्रिल, २०२१ पर्यंत एकूण ४९ कोटी रुपये दंड म्हणून आकारण्यात आला आहे. हा आकडा चिंताजनक आहे. प्रत्येक मुंबईकराने सार्वजनिक जागी कृपया मास्क लावावा, असे नम्र आवाहन करीत आहोत.
मुंबई लोकल सुरू झाल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढली का?
मुंबई पोलिसांनीही मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई केली आहे. मुंबई पोलीस आणि मार्शल्स यांच्या पथकाने गेल्या वर्षभरात ही दंड वसुली केली आहे. मुंबईल्या वेगवेगळ्या रेल्वे स्टेशन्सवर क्लिन अप मार्शल्स नियुक्त करण्यात आले आहेत. प्रवासी हे कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळत आहेत की नाही किंवा मास्क घालत आहेत की नाही यावर त्यांची करडी नजर असते. जे लोक मास्क घालत नाहीत, विनामास्क फिरतात त्यांच्याकडून दंड वसूल केला जातो असंही मुंबई महापालिकेने म्हटलं आहे.
दंडवसुली कशी करण्यात आली?
मुंबई महापालिकेने विनामास्क फिरणाऱ्यांवर जी कारवाई केली त्यातून ४३ कोटी ८२ लाख ५१ हजार आणि ८०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मुंबई पोलिसांनी जी कारवाई केली त्याद्वारे ४ कोटी ८८ लाख ७० हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला
जे लोक लोकल प्रवासात विनामास्क फिरत होते अशांकडून ४४ लाख २४ हजार ६० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
आता दंडाची रक्कम ही २०० वरून ५०० रूपये करण्यात आली आहे. तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १ हजार रूपयांचा दंड घेण्यात येतो आहे. मुंबई महापालिकेने या दंडवसुलीनंतरही मुंबईकरांना आवाहन केलं आहे की आपण मास्क घालावा आणि कोरोना प्रतिबंधाचे नियम पाळावेत.
मुंबईत कोरोना हातपाय पसरतो आहे.. गेल्या काही दिवसांमध्ये रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशात निर्बंध अधिकाधिक कठोर करणं आणि जे निर्बंध पाळत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणं हा आत्ता आमच्यासमोर उपाय दिसतो आहे असंही मुंबई महापालिकेने म्हटलं आहे.
ADVERTISEMENT