एकनाथ शिंदेंनी केलं राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंना कोपरखळ्या

मुंबई तक

• 02:32 PM • 21 Oct 2022

मनसेच्या दीपोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. या ठिकाणी राज ठाकरेही होतेच. मनसेच्या दीपोत्सवात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे तिघेही एकाच मंचावर आल्याचं पाहण्यास मिळालं. तसंच यावेळी आपल्या खास शैलीत भाषण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंचं कौतुक केलं तर उद्धव ठाकरेंना टोले लगावले. मुख्यमंत्री एकनाथ […]

Mumbaitak
follow google news

मनसेच्या दीपोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. या ठिकाणी राज ठाकरेही होतेच. मनसेच्या दीपोत्सवात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हे तिघेही एकाच मंचावर आल्याचं पाहण्यास मिळालं. तसंच यावेळी आपल्या खास शैलीत भाषण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंचं कौतुक केलं तर उद्धव ठाकरेंना टोले लगावले.

हे वाचलं का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंबाबत काय म्हणाले?

मागच्या दहा वर्षांपासून राज ठाकरे हा कार्यक्रम करत आहेत. अत्यंत सुंदर आणि नेत्रदीपक असा सोहळा ते आयोजित करतात. मात्र आज आम्हाला या कार्यक्रमाला येण्याचा योग आला. इतके दिवस इच्छा होती पण येता येत नव्हतं. तसंच राज ठाकरे आम्हाला पत्र लिहित असतात. लोकांच्या समस्या मांडत असतात ही अतिशय चांगली गोष्ट आहे. राज ठाकरे यांना कायमच लोक भेटायला येत असतात आणि त्यांना आपल्या समस्या सांगत असतात. त्या समस्या राज ठाकरे आमच्या पर्यंत घेऊन येत असतात. त्यांच्या सूचनाही आम्ही ऐकतो असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंचं भरभरून कौतुक केलं.

उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंनी नेमके काय टोले लगावले?

राज ठाकरे यांचं कौतुक करत असतानाच एकनाथ शिंदे म्हणाले की कोव्हिड काळात आम्ही काम करत होतो तेव्हाही फिरत होतो. आम्ही घरात बसून राहिलो नव्हतो. असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या घरात बसून राहण्यावर त्यांनी भाष्य केलं. तसंच राज ठाकरेंना उद्देशून ते म्हणाले की तुमचं काम असेल तेव्हा तुम्ही आमच्या दोघांकडे म्हणजेच माझ्याकडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कधीही येऊ शकता आम्ही दोघंही रात्री उशिरापर्यंत काम करत असतो. असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या काम न करण्यावर त्यांनी बोट ठेवलं.

इच्छा असूनही राज ठाकरेंना भेटू शकत नव्हतो

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणाले की राज ठाकरे गेल्या दहा वर्षांपासून हा नेत्रदीपक म्हणाला असा दीपोत्सव साजरा करत आहेत मात्र आमची इच्छा असूनही आम्ही या कार्यक्रमाला येऊ शकत नव्हतो. उद्धव ठाकरेंसोबत असताना राज ठाकरेंच्या कार्यक्रमाला येण्याला बंदी होती हेच एकनाथ शिंदे यांनी या वाक्यातून दाखवून दिलं आहे. तसंच हे लोकांचं सरकार आहे हे सांगत असताना माझ्याकडे कधीही कुणीही येऊदेत मी सगळ्यांना भेटत असतो असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

वर्षा बंगल्यावर किंवा मातोश्रीवर असताना उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना भेटत नसत ही तक्रार गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी या तक्रारीवरही बोट ठेवलं. आज त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव कुठेच घेतलं नाही. मात्र हे जे खास चार टोले लगावले ते उद्धव ठाकरेंनाच. त्यामुळे त्यांचं भाषण छोटेखानी असूनही लक्षात राहण्यासारखंच होतं.

    follow whatsapp