प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक
ADVERTISEMENT
नाशिकमधील सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मल्हार खान येथे एका व्यक्तीच्या लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात विनापरवानगी वाद्य वाजवले जात होते. त्याठिकाणी पोलिसांनी जाऊन चौकशी केली असता, त्यांनी परवानगी न घेतल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी कडक कारवाई करत नवरदेवासह त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे….
तुळशीविवाहानंतर विवाहसोहळे सुरु झाले आहेत. कोरोनाच्या लाटेनंतर आता निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे जंगी विवाहसोहळ्यांना सुरुवात झाली आहे. मात्र, शहरात पोलिसांची परवानगी न घेतल्यास कारवाई होत असल्यामुळे लग्नसोहळे आयोजित करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसाद संतोष बुकाणे त्याच्या यांच्या हळदीच्या निमित्ताने वाद्यं वाजवली जात होती. आवाज आल्याने सरकारवाडा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्या ठिकाणी जाऊन लग्नाचे वाद्य वाजविण्यासाठी आपण परवानगी घेतली आहे का ? असे विचारले. दरम्यान, कार्यक्रमासाठी कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे दिसून आले. त्यावरून सरकारवाडा पोलिसांनी नवरदेव प्रसाद आणि त्यांचे वडील संतोष बुकाणे यांच्यासह वाद्य वाजवणाऱ्या सहा व्यक्तींवर सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वाद्य देखील जप्त करण्यात आली आहेत.
त्यामुळे यापुढे लग्न असो किंवा कुठल्या समारंभ असो त्या ठिकाणी वाद्य वाचवायचे असेल तर पोलिसांची परवानगी आवश्यक आहे, असा संदेश पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
ADVERTISEMENT