Balasaheb Thorat यांनी मौन सोडलं! तांबेंचं अभिनंदन करत म्हणाले, ‘जे झालं ते…’

मुंबई तक

05 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:06 AM)

Balasaheb Thorat on congress and Satyajeet Tambe संगमनेर : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अखेर सत्यजीत तांबे आणि नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीतील वाद, राजकारण याविषयीच मौन सोडलं. तब्बल महिन्याभरानंतर त्यांनी थेट मुंबईतून याबाबत भाष्य केलं. “जे झालं ते पक्षीय राजकारण असून याबाबत बाहेर भाष्य करणं हा माझा स्वभाव नाही. माझ्या भावना मी पक्षश्रेष्ठींना कळवल्या […]

Mumbaitak
follow google news

Balasaheb Thorat on congress and Satyajeet Tambe

हे वाचलं का?

संगमनेर : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अखेर सत्यजीत तांबे आणि नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीतील वाद, राजकारण याविषयीच मौन सोडलं. तब्बल महिन्याभरानंतर त्यांनी थेट मुंबईतून याबाबत भाष्य केलं. “जे झालं ते पक्षीय राजकारण असून याबाबत बाहेर भाष्य करणं हा माझा स्वभाव नाही. माझ्या भावना मी पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत”, असं त्यांनी स्पष्ट केलं. (Congress leader balasaheb thorat frist reaction on satyajit tambe mlc election congress and bjp)

बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आज संगमनेरमध्ये मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र थोरात स्वतः उपचारासाठी मुंबईत आहेत. यावेळी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

Satyajeet Tambe : “सत्यजित, तुला…”, अजित पवारांनी काय सांगितलं?

बाळासाहेब थोरात म्हणाले, मधल्या काळात खूप राजकारण झालं. सत्तांतरापासून तालुक्यावर सूड उगवला जात आहे. कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. चांगले चालू असणारे अनेक उद्योग – व्यवसाय बंद पाडले जात आहेत. पण आपण संघर्षातून मोठे झालो आहोत. याही संघर्षातून आपण बाहेर येऊ आणि आणखी नव्या उमेदीने उभं राहू, असा आशावाद यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.

विधान परिषदेबाबत बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठं राजकारण झालं. पण सत्यजित मोठ्या मताने विजयी झाला, त्याचं मनापासून अभिनंदन करतो. पण जे काही राजकारण झालं ते मला व्यथित करणारं आहे, ही वस्तुस्थिती आहे. या बाबतच्या माझ्या भावना मी पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत. हे पक्षीय राजकारण आहे. याबद्दल बाहेर जाहीर भाष्य करणं हा माझा स्वभाव नाही. हा पूर्णपणे पक्षीय प्रश्न असून याबतीत पक्ष आणि मी मिळून योग्य तो निर्णय घेऊ. बाकी लोकांनी याबाबत विचार करण्याची गरज नाही, असंही त्यांनी इतर पक्षीय नेत्यांना सुनावलं.

Satyajeet Tambe: मी जर प्रदेशाध्यक्ष असतो, तर…; तांबेंचं मोठं विधान

मधल्या काळात अनेक बातम्या आल्या. अगदी भाजप पर्यंत पोहचवण्याचं काम झालं. भाजपच तिकिट वाटपही त्यांनी केलं. काही लोकं मुद्दाम ही काम करतात. पण आपला विचार कॉंग्रेसचा आहे. आतापर्यंत याच विचाराने जात आहोत आणि यापुढेही आपल्याला काँग्रेसच्याच विचाराने पुढे जायचं आहे याबाबत मी तुम्हाला ग्वाही देतो, असं म्हणत त्यांनी त्यांच्या आणि सत्यजीत तांबे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

    follow whatsapp