नागपुरात कोरोना रूग्णाला Remdesivir इंजेक्शनऐवजी अॅसिडिटीचं इंजेक्शन देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. नागपुरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होतो असल्याच्या घटनाही घडत आहेत. अशात हा प्रकार समोर आला आहे. नागपुरातल्या जामठा या भागात असलेल्या कोव्हिडालय रूग्णालयात काम करणाऱ्या दिनेश गायकवाड या पुरुष नर्सने त्यांच्या रूग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रूग्णा रेमडेसिवीरऐवजी अॅसिडिटी इंजेक्शन टोचले.
ADVERTISEMENT
नर्सने चोरून विकले रेमडेसिवीर, घरातही सापडले ‘एवढे’ इंजेक्शन
या इंजेक्शनच्या बदल्यात या पुरुष नर्सने रेमडेसिवीरचे इंजेक्शन चोरले. गणेश गायकवाड याने रुग्णालयाच्या रेकॉर्डवर तीन डोस रूग्णाला दिल्याची नोंद केली परंतु प्रत्यक्षात रुग्णाला फक्त एक रेमडेसिवीरचा डोस देण्यात आला उरलेल्या दोन डोस नागपूरला मित्राच्या मदतीने 35000 रुपये किमतीला विकण्याच्या वेळी पोलिसांनी त्यांना अटक केली, धक्कादायक बाब ही आहे की या संपूर्ण प्रकरणात चार पुरुष व एक महिला फिजिओथेरपीस्टचा सुद्धा समावेश आहे जी कमिशनच्या नादामध्ये अशा कामांमध्ये गुंतली गेल्याचे पोलीस सांगत आहेत. पोलिसांच्या मते सुदैवाने ज्या रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शनच्या जागी अॅसिडिटीचे इंजेक्शन देण्यात आले होते तो रुग्ण बरा होऊन रुग्णालयातून घरी परत गेला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत..
ADVERTISEMENT