चंद्रपुरात कोरोना आऊट ऑफ कंट्रोल, बेड्ससाठी रूग्णांचा चंद्रपूर ते तेलंगणा प्रवास

मुंबई तक

• 10:23 AM • 14 Apr 2021

71 वर्षाचे किशोर नारशेट्टीवार…सध्या किशोर जीवन आणि मरणाची लढाई लढत असून यामध्ये केवळ एका व्हेंटिलेटर बेडचं अंतर आहे. कोविड रूग्णालयासमोरच अँब्युलन्समध्ये ऑक्सिजन लावून ते आपल्याला बेड कधी मिळेल याची वाट पाहतातय. कारण चंद्रपूरमध्ये सध्या कोविड रूग्णांना बेड्स उपलब्ध होत असून बेड्ससाठी रूग्णांना वणवण भटकावं लागतंय. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती पुन्हा एकदा गंभीर झालीये. राज्यात अनेक ठिकणी […]

Mumbaitak
follow google news

71 वर्षाचे किशोर नारशेट्टीवार…सध्या किशोर जीवन आणि मरणाची लढाई लढत असून यामध्ये केवळ एका व्हेंटिलेटर बेडचं अंतर आहे. कोविड रूग्णालयासमोरच अँब्युलन्समध्ये ऑक्सिजन लावून ते आपल्याला बेड कधी मिळेल याची वाट पाहतातय. कारण चंद्रपूरमध्ये सध्या कोविड रूग्णांना बेड्स उपलब्ध होत असून बेड्ससाठी रूग्णांना वणवण भटकावं लागतंय.

हे वाचलं का?

महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती पुन्हा एकदा गंभीर झालीये. राज्यात अनेक ठिकणी बेड्चा तुटवडा जाणवतोय. अशीच काहीशी परिस्थिती चंद्रपूरमध्ये पहायला मिळतेय. चंद्रपूरात कोरोनाची परिस्थिती भीषण झाली असून हाताबाहेर गेली आहे. जिल्ह्यात सध्या एकंही बेड उपलब्ध नसून रूग्णांना फार त्रास सहन करावा लागतोय.

चंद्रपूरात सरकारी रूग्णालय असो किंवा खाजगी कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी बेड्स उपलब्ध नाहीत. परिस्थितीत इतकी बिकट आहे की, रूग्णांच्या नातेवाईकांनी रूग्णांसाठी बेड्सच्या शोधात थेट तेलंगणा राज्यातही धाव घेतली आहे. अनेकजण रूग्णांना अँब्युलन्समध्ये घेऊन बेड्सच्या शोधात आहे. चंद्रपूरात राहणाऱ्या किशोर यांची परिस्थिती देखील अशीच आहे. सध्या किशोर रूग्णालयात समोर अँब्युलन्समध्ये बसून बेडची वाट पहावी लागतेय. आजूबाजूच्या परिसरात नाही तर शेजारील राज्य तेलंगणामध्येही बेड्स रिकामी नाहीत.

चंद्रपूरच्या वरोरा शहरात राहणारे रुग्ण किशोर नारशेट्टीवार यांचा मुलगा सागर याच्या सांगण्यानुसार, वडिलांना अँब्युलन्समधून घेऊन दोन दिवसांपासून जिल्ह्यातील प्रत्येक सरकारी आणि खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध आहे का हे पाहतोय. इथे बेड नसतानाही ते तेलंगणातील मंचेरल आम्हाला बेड मिळाला नाही. नाईलाजाने चंद्रपूरात पुन्हा येऊन कोविड रुग्णालयासमोर अँब्युलन्स ठेवून मदतीसाठी विनवणी करतोय.

गेल्या 24 तासात चंद्रपुरात कोरोनाचा हाहाकार बघायला मिळत आहे. 4370 नमुने तपासणीतून आतापर्यतच्या विक्रमी 1010 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. 24 तासात 14 मृत्यू झाले असून सक्रिय बाधितांची संख्या 6549 एवढी झाली आहे. एकूण मृत्यू 516 झाले असून आरोग्य यंत्रणा एवढे बाधीत उपचार करताना कोलमडली आहे.

    follow whatsapp