मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने धडक दिली असून वाढणारी रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉनची चिंता यामुळे राज्य सरकारने निर्बंध लागू केले आहेत. एकीकडे मुंबईतली रुग्णसंख्या वाढ चिंतेचा विषय ठरत असताना उप-राजधानी नागपूरमध्येही दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासात नागपुरात ८८ कोरोनाच्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट नागपुरकरांसाठी धोक्याची चाहूल घेऊन आलेली आहे.
ADVERTISEMENT
गेल्या आठवडाभराचा कोरोनाच्या रुग्ण वाढीची संख्या बघितली तर रुग्णसंख्या प्रत्येक दिवशी दुप्पटीने वाढत असल्याचं दिसतं आहे. कोरोनाची ही रुग्णवाढ प्रशासनासोबतच नागपूरकरांची सुद्धा चिंता वाढविणारी आहे. नागपुरात आतापर्यंत ओमीक्रोनचे एकूण ६ रुग्ण आढळून आलेले आहेत त्यापैकी ३ रुग्णांनी ओमीक्रोन वर यशस्वी मात केली आहे.. तर बाकी रुग्णांवर नागपूरच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मागील आठवडाभरातील नागपुरातील कोरोना रूग्णांची संख्या –
-
२३ डिसेंबर – ६ रुग्ण
-
२४ डिसेंबर – १० रुग्ण
-
२५ डिसेंबर- २१ रुग्ण
-
२६ डिसेंबर- ३३ रुग्ण
-
२७ डिसेंबर- १२ रुग्ण
-
२८ डिसेंबर- ३५ रुग्ण
-
२९ डिसेंबर- २९ रुग्ण
-
३० डिसेंबर- ३१ रुग्ण
-
३१ डिसेंबर- ८८ रुग्ण
ही वाढती रुग्णसंख्या पाहता नागपुरकरांनी काळजी घेणं आवश्यक असल्याचं बोललं जातंय. आजही नागपूरच्या बाजारपेठांमध्ये नागरिक खरेदीसाठी मोठी गर्दी करताना दिसत आहे. अशावेळी ही गर्दी रुग्णसंख्या वाढीला निमंत्रण देणारी ठरु शकते. ज्यामुळेच प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडताना मास्कचा वापर करुन सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
Omicron cases : देशातील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 415 वर; महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण
ADVERTISEMENT