Cyclone Alert : कोविड सेंटरमधील रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात

मुंबई तक

• 05:01 PM • 15 May 2021

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या मुंबईवर सध्या तौकताई वादळाचं संकट घोंगावत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत कोविड सेंटरमधील रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईच्या दहीसर येथील MMRC च्या कोविड सेंटरमधून रुग्णांना दुसऱ्या कोविड सेंटरमध्ये हलवण्यात येत आहे. वयोवृद्ध रुग्णांना कोविड सेंटरमधील कर्मचारी काळजीपूर्वक स्थलांतरित करताना… १६ आणि १७ मे ला मुंबईत पाऊस […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या मुंबईवर सध्या तौकताई वादळाचं संकट घोंगावत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत कोविड सेंटरमधील रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात झाली आहे.

मुंबईच्या दहीसर येथील MMRC च्या कोविड सेंटरमधून रुग्णांना दुसऱ्या कोविड सेंटरमध्ये हलवण्यात येत आहे.

वयोवृद्ध रुग्णांना कोविड सेंटरमधील कर्मचारी काळजीपूर्वक स्थलांतरित करताना…

१६ आणि १७ मे ला मुंबईत पाऊस आणि वारा वाहण्याचा इशारा IMD ने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने ज्या ठिकाणी धोका उद्भवू शकेल अशा ठिकाणांवरील कोविड सेंटरमधील रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरुन जाताना शहरातील कोविड सेंटरमध्ये कोणताही अनुचित प्रसंग घडू नये यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे. दहिसर कोविड सेंटरमधील रुग्णांना घेऊन ही बस अखेरीस दुसऱ्या ठिकाणी रवाना झाली.

    follow whatsapp