Valentine day : ‘काऊ हग डे’ अपिल रद्द; मोदी सरकारची सपशेल माघार!

मुंबई तक

10 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:04 AM)

नवी दिल्ली : विरोधकांच्या प्रचंड विरोधानंतर केंद्र सरकारने 14 फेब्रुवारी हा दिवस ‘गो आलिंगन दिन’ म्हणून साजरा करण्याचं आवाहन मागे घेतलं आहे. केंद्रीय मत्स्य पालन, पशुपालन आणि डेअरी मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या पशु कल्याण मंडळाने 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ हा ‘काऊ हग डे’ म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं होतं. पण आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस सारख्या अनेक […]

Mumbaitak
follow google news

नवी दिल्ली : विरोधकांच्या प्रचंड विरोधानंतर केंद्र सरकारने 14 फेब्रुवारी हा दिवस ‘गो आलिंगन दिन’ म्हणून साजरा करण्याचं आवाहन मागे घेतलं आहे. केंद्रीय मत्स्य पालन, पशुपालन आणि डेअरी मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या पशु कल्याण मंडळाने 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ हा ‘काऊ हग डे’ म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं होतं. पण आम आदमी पक्ष आणि तृणमूल काँग्रेस सारख्या अनेक विरोधी पक्षांनी या आवाहनाला विरोध दर्शविला होता. (Following huge opposition from the opposition, the central government has withdrawn its call to celebrate February 14 as ‘Go Hug Day’)

हे वाचलं का?

14 फेब्रुवारी हा गो आलिंगन दिवस म्हणून साजरा करण्याच्या निर्णयावर टीका करत शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी हेही मोदी यांच्यासाठी पवित्र गायीसारखे असल्याचं शिवसेनेनं म्हंटलं होतं. तर तृणमूल काँग्रेसचे खासदार शंतनू सेन म्हणाले होते की, गो हग डे हा छद्म-हिंदुत्व आणि छद्म-देशभक्ती आहे, ज्याचा उद्देश मुख्य प्रवाहातील समस्यांपासून लक्ष विचलित करणं आहे. सीपीआय(एम) नेते इलामाराम करीम यांनी तर काऊ हग डे ही देशासाठी हास्यास्पद आणि लज्जास्पद संकल्पना असल्याचं म्हटलं होतं.

Delhi Mumbai Expressway: भारतातील सर्वात लांब Expressway चे Exclusive फोटो

काय होता निर्णय?

केंद्रीय मत्स्य पालन, पशुपालन आणि डेअरी मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या पशु कल्याण मंडळाने 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ हा ‘काऊ हग डे’ म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं होतं. गायीला मिठी मारून त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करावं आणि ‘व्हॅलेंटाईन डे’ हा ‘काऊ हग डे’ साजरा करावा, असं आवाहन पशु कल्याण मंडळानं केलं होतं.

Congress वाढवण्यासाठी पाठवलं, तोडण्यासाठी नाही! बड्या नेत्यानं पटोलेंना सुनावलं

“सर्व गाईप्रेमींनी गाईचे महत्त्व लक्षात घेऊन 14 फेब्रुवारी हा दिवस गायींना मिठी मारून साजरा करावा, यामुळे जीवन आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेनं परिपूर्ण बनवण्यासाठी मदत होईल. गाय भारतीय संस्कृतीचा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, आपल्या जीवनाचा आधार आहे. गाय पशुसंपत्ती आणि जैवविविधतेचे प्रतिनिधित्व करते. तिला ‘कामधेनू’ आणि ‘गौमाता’ म्हणून ओळखलं जातं, असं पशु कल्याण मंडळाने त्यांच्या आवाहन पत्रकात म्हटलं होतं.

गाईचं जतन केल्यानं ‘पाश्चात्य संस्कृतीच्या’ प्रगतीमुळे लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या वैदिक परंपरांचे जतन करण्यात मदत होईल, असं मंडळानं म्हटलं आहे. पाश्‍चिमात्य संस्कृतीच्या झगमगाटामुळे आपण आपली भौतिक संस्कृती आणि वारसा जवळजवळ विसरलो आहोत. म्हणून, सर्व गोप्रेमींनी 14 फेब्रुवारी हा दिवस गाईला मिठी मारुन साजरा करावा, असं ही या पत्रकात लिहिलं होतं.

    follow whatsapp