गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना राज्य सरकार लोकांना गर्दी न करण्याच्या सूचना देत आहे. कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये गर्दी टाळावी असे नियम घालून देण्यात आले आहेत. परंतू सरकार करत असलेल्या आवाहनचा लोकांवर काहीही फरक पडताना दिसत नाहीये.
ADVERTISEMENT
दादरच्या मार्केटमध्ये गणेशोत्सवानिमीत्त रस्ते गर्दीने फुलून गेले होते. मखरं, रंगीबेरंगी विजेची तोरणं, सजावटीचं साहीत्य घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाच्या सर्व नियमांचा फज्जा उडालेला पहायला मिळाला. या गर्दीत हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या लोकांनी मास्क घातले होते तर बहुतांश लोकं विनामास्क फिरताना पहायला मिळाले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सध्या निर्बंध लादण्याचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केलंय. परंतू लोकांनी कोविडच्या नियमांचं पालन करणं गरजेचं असल्याचंही टोपेंनी स्पष्ट केलं. एकीकडे राजकीय सभांमध्ये गर्दीचे सर्व नियम तोडले जात असताना आता सणासुदीच्या पार्श्वभूमीवर लोकांनी गर्दी करायला सुरुवात केलेली पहायला मिळत आहे.
राज्यात नव्याने निर्बंध लावण्याचा कोणताही प्रस्ताव नाही – Rajesh Tope यांची माहिती
ADVERTISEMENT