Mumbai Rains: मुंबईतील पावसाचा धडकी भरवणारा VIDEO, तौकताई चक्रीवादळाचा प्रकोप

मुंबई तक

• 06:10 AM • 17 May 2021

मुंबई: तौकताई चक्रीवादळाने (Tauktae Cyclone) सध्या मुंबईला जबरदस्त तडाखा दिला आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईतील अनेक परिसरात तुफान पाऊस बरसत आहे. (heavy rains in mumbai) आजवर मुंबईकरांनी कधीही पाहिला नसेल एवढ्या वेगाने आज पाऊस कोसळत आहे. याशिवाय येथे वाऱ्याचा वेग (mumbai cyclone) देखील प्रचंड आहे. मुंबईतील पावसाचे काही व्हीडिओ ‘मुंबई तक’च्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहेत. […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: तौकताई चक्रीवादळाने (Tauktae Cyclone) सध्या मुंबईला जबरदस्त तडाखा दिला आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईतील अनेक परिसरात तुफान पाऊस बरसत आहे. (heavy rains in mumbai) आजवर मुंबईकरांनी कधीही पाहिला नसेल एवढ्या वेगाने आज पाऊस कोसळत आहे. याशिवाय येथे वाऱ्याचा वेग (mumbai cyclone) देखील प्रचंड आहे.

हे वाचलं का?

मुंबईतील पावसाचे काही व्हीडिओ ‘मुंबई तक’च्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहेत. पाहा मुंबईतील पावसाचे धडकी भरवणारे काही व्हीडिओ.

1. मुंबईत तौकताई चक्रीवादळामुळे प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत. एवढंच नव्हे तर यामुळे तुफान वेगाने पाऊस मुंबईत कोसळत आहे. या पावसाचे ही दृश्य नक्कीच धडकी भरवणारी आहेत. ही दृश्य मुंबईच्या गिरगाव भागातील आहेत. (Video – मंगेश आंब्रे)

2. तौकताई चक्रीवादळामुळे मुंबईत सध्या तुफान पाऊस बरसत आहे. या पावसाचा जोर प्रचंड असून आजपर्यंत मुंबईकरांनी कधीही असा पाऊस पाहिलेला नव्हता.

3. मुंबईतील समुद्रकिनारी कोसळणाऱ्या या पावसामुळे दृश्यमानता देखील बरीच कमी झाली आहे. तसंच यामुळे समुद्र देखील खवळला असल्याचं पाहायला मिळत आहे.

4. मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात पाऊस आणि वारा या दोन्हीचा वेग प्रचंड आहे. त्यामुळे येथे उभं राहणं देखील कुणाला शक्य होणार नाही. त्यामुळे अत्यंत आवश्यकता असेल तरच घरातून बाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

तौकताई या चक्रीवादळाचं संकट मागील दोन दिवसांपासून देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर घोंघावत आहे. सुरुवातीला केरळ, कर्नाटक आणि गोवा या राज्याच्या किनारपट्टी भागांना तडाखा दिलेल्या या चक्रीवादळाने कालपासून (16 मे) महाराष्ट्राच्या सागरी भागात प्रवेश केला आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात या वादळाचं रौद्र रुप पाहायला मिळालं. सध्या हे वादळ मुंबईच्या जवळपास पोहचलं असल्याने सध्या मुंबईसह उपनगरात सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या सरी बरसत असल्याचं पाहायला मिळत आहे.

    follow whatsapp