महाराष्ट्रावर रुग्णवाढीचं संकट कायम, जाणून घ्या आजची आकडेवारी

मुंबई तक

• 03:37 PM • 29 Mar 2021

फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावधीपासून महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढायला लागली. महिनाभरातच राज्याच्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढीचा वेग हा चिंताजनक असून राज्य सरकारने पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याची तयारी केली आहे. अनेक शहरांमध्ये सरकारने निर्बंध कडक केले असले तरीही रुग्णसंख्येचा वेग हा काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. आज राज्यात ३१ हजार ६४३ नवे कोरोनाबाधित रुग्ण […]

Mumbaitak
follow google news

फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावधीपासून महाराष्ट्रातील महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढायला लागली. महिनाभरातच राज्याच्या अनेक महत्वाच्या शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढीचा वेग हा चिंताजनक असून राज्य सरकारने पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याची तयारी केली आहे. अनेक शहरांमध्ये सरकारने निर्बंध कडक केले असले तरीही रुग्णसंख्येचा वेग हा काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. आज राज्यात ३१ हजार ६४३ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.

हे वाचलं का?

आज २० हजार ८५४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून राज्याचा रिकव्हरी रेट हा ८५.७१ टक्के इतका आहे. दरम्यान आजही राज्यात १०२ जणांनी कोरोनाशी लढताना आपले प्राण गमावले आहेत. या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाउनची तयारी केली असली तरीही शिवसेनेला त्यांच्यात पक्षातून विरोधाचा सामना करावा लागतो आहे.

कोरोनाची रुग्णसंख्या पाहून BMC ने कसली कंबर, सर्व हॉस्पिटल्सना सज्ज राहण्याचे आदेश

“मुख्यमंत्र्यांनी पूर्णपणे लॉकडाउनचा विचार न करता निर्बंध अधिक कडक करण्याबाबत विचार करावा. संपूर्णपणे लॉकडाउन केल्यास राज्याच्या अर्थव्यवस्थेला याचा फटका बसेल. गरिबांना पुन्हा एकदा याची झळ बसेल. उद्योगधंदे, व्यापारी, दुकानदार, कामगार वर्गाला पुन्हा एकदा याचा फटका बसू शकतो. म्हणूनच पूर्णपणे लॉकडाउन लावू नये असं माझं मत आहे.” संजय राऊत इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

‘मातोश्रीवर बसून सर्वसामान्यांचा त्रास कसा कळणार? लॉकडाउनला आमचा कडवा विरोध’

यासंदर्भात आपलं मुख्यमंत्र्यांशी बोलणंही झाल्याचं राऊत यांनी स्पष्ट केलं. “पूर्णपणे लॉकडाउन लावण्यापेक्षा राज्य सरकारने निर्बंध अधिक कडक करण्याबाबत विचार करावा. रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ आपल्याला थांबवायची आहे आणि ही वाढ जर निर्बंध अधिक कडक केले तर आपण रोखू शकतो. आता पुन्हा लॉकडाउन लावल्यास सामान्य जनतेसोबत राज्य सरकारलाही याचा फटका बसू शकतो. लॉकडाउन लागल्यास सर्व उद्योगधंदे बंद होतील आणि सरकारला कराच्या स्वरुपात मिळणारा पैसा मिळणार नाही.”

    follow whatsapp