राज्यात आज कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या अधिक, जाणून घ्या आजची आकडेवारी

मुंबई तक

• 04:23 PM • 09 May 2021

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रासाठी काहीशी आनंदाची बातमी आहे. आज राज्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या ही अधिक आहे. आज राज्यात ४८ हजार ४०१ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून ६० हजार २२६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होऊन घरी परतण्याची आकडेवारी वाढत असली तरीही मृत्यूचा दर अद्याप म्हणावा तसा […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्रासाठी काहीशी आनंदाची बातमी आहे. आज राज्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या ही अधिक आहे. आज राज्यात ४८ हजार ४०१ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून ६० हजार २२६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण बरे होऊन घरी परतण्याची आकडेवारी वाढत असली तरीही मृत्यूचा दर अद्याप म्हणावा तसा नियंत्रणात येत नसल्यामुळे आरोग्य व्यवस्थेसमोरचं संकट अद्याप टळलेलं नाही. आज राज्यात ५७२ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला.

हे वाचलं का?

दुसरीकडे मुंबईत आज २ हजार ४०३ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले असून ३ हजार ३७५ रुग्ण कोरोनामधून सावरुन घरी परतले आहेत. याचसोबत आज मुंबईत ६८ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मुंबईतील रुग्णसंख्या, मृतांचा आकडा आणि इतर निकषांबाबत महापालिका व्यवस्थापनावर गेल्या काही दिवसांपासून आरोप होत होते. या आरोपांबाबत महापालिकेने पत्रक जाहीर करत स्पष्टीकरण दिलं आहे.

महापालिकेने काय दिलंय स्पष्टीकरण?

कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबाबत प्रशासनाकडून कोणतीही आकडेवारी लपवली जात नाही किंवा त्याच्याशी छेडछाड केली जात नाही. दैनंदिन आरोग्य वार्तापत्रातून कोविड मृत्युंचे आकडे जाहीर केले जातातच. कोविड-१९ संबंधीच्या राष्ट्रीय संकेतस्थळावर संकेतस्थळावर देखील त्याची नोंद असते. सरकारकडेही नियमितपणे त्याची माहिती सादर करण्यात येते. त्यामुळे आकडे स्पष्ट सांगितले जात नसल्याचा आरोप हा बिनबुडाचा ठरतो.

कोविड मृत्यू व कोविड इतर (covid other) कारणांनी मृत्यू हे निकष महानगरपालिका प्रशासनाने स्वतः निश्चित केलेले नाहीत. जागतिक आरोग्य संघटना, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (आयसीएमआर) व केंद्र सरकार यांनी ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसारच कोविड रुग्णांच्या मृत्युंची नोंद करण्यात येते. त्याबाबतची सर्व माहिती नोंदवून जतन करण्याची कार्यवाही नियिमतपणे केली जाते. त्यांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. त्यानुसारच मृत्यूचे कारण (Cause of Death) व इतर माहिती नोंदवली जाते आहे. कोरोना बाधित मृतांची आकडेवारी देताना त्यासोबत त्यांना असलेल्या इतर आजारांचा ही उल्लेख केला जातो. याचा अर्थ कोविड हे कारण झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गृहीत धरला जाऊ नये. हे विश्लेषण दैनंदिन आरोग्य वार्तापत्रातून देखील पारदर्शकपणे प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामागचा हेतू इतर आजारांचे निमित्त पुढे करणे असा होत नाही. उलट संबंधित इतर आजार असलेल्या नागरिकांनी आपापल्या परीने योग्य काळजी घ्यावी, नियमितपणे औषधे घ्यावीत, असे जाहीर आवाहन करून संबंधित नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे.

    follow whatsapp