NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण समीर वानखेडे यांच्या विरोधात आता दलित संघटनांनी जात पडताळणी समितीकडे तक्रार केली आहे. त्यामुळे समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार अशी चिन्हं आहेत. महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याबाबतची काही कागदपत्रं दाखवून त्यांच्यावर बरेच आरोप केले होते. अशात आता समीर वानखेडे यांच्या विरोधात दलित संघटनांनी आता तक्रार केली आहे. त्यामुळे आधीच्या तुलनेत समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
ADVERTISEMENT
दलित संघटनांतर्फे हा दावा करण्यात आला आहे की समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवण्यासाठी स्वतः SC असल्याचं सांगितलं होतं. आरक्षणाचे हक्क मिळवण्यासाठी त्यांनी खोटी कागदपत्रं सादर केली असा आरोप स्वाभिमानी रिपब्लिकन आर्मी आणि भीम आर्मीतर्फे करण्यात आला आहे. या दोहोंतर्फे जिल्हा जात पडताळणी समितीकडे तक्रार केली आहे. काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे दिल्लीतल्या अनुसुचित जाती-जमाती आयोगाच्या कार्यालयात पोहचले होते. या ठिकाणी समीर वानखेडे यांनी त्यांच्या जातीचं प्रमाणपत्र, पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलाचा जन्म दाखला तसंच तलाकचे कागदपत्रं सगळं सादर केलं होतं. या कागदपत्रांची पडताळणी आयोगाकडून केली जाते आहे. अशात त्याआधीच समीर वानखेडे यांच्याविरोधात आरोप होण्यास सुरूवात झाली आहे.
धर्मांतर केलं नाही मी हिंदूच, नवाब मलिकांच्या आरोपांना ज्ञानेश्वर वानखेडेंचं पुरावे दाखवत उत्तर
भीम आर्मीने काय म्हटलं आहे?
समीर वानखेडे यांनी महार या अनुसुचित जातीचा खोटा दाखला मिळवून त्या आधारे युपीएसी मध्ये अनुसुचित जाती कोट्याखाली 2008 मध्ये आय. आर. एस. कस्टम आणि सेंट्रल एक्साईज विभागात खोटी माहिती आणि पुरावे सादर करून नोकरी मिळवली आहे. असा उल्लेख असलेला अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे देण्यात आला आहे.
समीर वानखेडे यांच्यावर जे काही आरोप केले जात आहेत त्यात त्यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी मीडियासमोर येऊन आणि कागदपत्रं दाखवत सांगितलं आहे की मी हिंदू दलित आहे, माझा मुलगाही हिंदू दलित आहे. त्यासाठीची सगळी कागदपत्रंही ज्ञानेश्वर वानखेडेंनी दाखवली आहेत. मी कधीही मुस्लिम धर्म स्वीकारला नाही असंही ज्ञानेश्वर वानखेडे यांनी सांगितलं आहे. मात्र समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचे वडील यांनी वारंवार हा दावा केला आहे की समीर वानखेडे मुस्लिम आहेत. त्यामुळेच मी माझ्या मुलीचं लग्न त्यांच्याशी लावून दिलं. निकाह झाला होता, मुस्लिम रितीरिवाज पाळून झाला होता असंही समीर वानखेडेंच्या सासऱ्यांनी सांगितलं आहे.
शाहरुख खानच्या मुलाला म्हणजेच आर्यन खानला समीर वानखेडेंनी अटक केली होती. त्यानंतर त्याचा जामीन होईपर्यंत नवाब मलिक यांनी अनेकदा आरोप करून समीर वानखेडे यांनी जातीचं खोटं प्रमाणपत्र दाखवून सरकारी नोकरी मिळवल्याचा दावा केला. प्रभाकर साईलचं नाव मीडियासमोर आलं त्यावेळी त्यानेही हा आरोप केला होता की के.पी. गोसावी यांनी शाहरुख खानकडे 25 कोटी मागितले होते. यातले 8 कोटी रूपये समीर वानखेडेंना द्यायचे असं के. पी. गोसावी म्हणाल्याचंही प्रभाकरने सांगितलं होतं. आर्यन खानच्या अटकेपासून जामीन मिळेपर्यंत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. अशात आता दलित संघटनाही समीर वानखेडेंच्या विरोधात गेल्या आहेत. त्यामुळे साहजिकच समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
ADVERTISEMENT