पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यात सभा घेणार यावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. पण पुण्यातील या सभेत मनसेने एक मोठा बदल केला आहे. त्यामुळे आता राज ठाकरेंची ही सभा मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. याबाबत मनसेने आता अधिकृत घोषणा केली.
ADVERTISEMENT
राज ठाकरे हे 21 मे रोजी पुण्यातील नदीपात्रात सभा घेणार होते. त्यासाठी तयारीही झाली होती. राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असतानाच ही तारीख ठरली होती. मात्र, आता यामध्ये एक बदल झाला आहे.
असं असताना काल अशी बातमी समोर आली आहे की राज ठाकरे यांची सभा रद्द झाली. मात्र आता राज ठाकरेंची सभेची तारीख, ठिकाण आणि वेळ सारं काही ठरलं असून त्याची अधिकृत माहितीच मनसेकडून देण्यात आली आहे.
राज ठाकरेंची पुण्यातील सभा कधी होणार?
राज ठाकरेंची पुण्यातील सभा ही 22 मे (रविवार) होणार आहे. ही सभा पुण्यातील गणेश कला क्रीडामंच, स्वारगेट येथे आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे आता या सभेचं संपूर्ण आयोजन करण्यासाठी मनसेकडे अवघे तीनच दिवस आहेत.
पुण्यातील सभेत कोणता मोठा बदल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना तुफान गर्दी होत असते. त्यामुळे या सभा प्रचंड मोठ्या मैदानांवर आणि संध्याकाळच्या सुमारास आयोजित केल्या जातात. जेणेकरुन कार्यकर्त्यांना त्याचा कोणताही त्रास होऊ नये.
मात्र, 22 तारखेच्या सभेत एक मोठा बदल मनसेने केला आहे. तो म्हणजे ही सभा चक्क सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे आता या सभेचं मनसे नेमकं कसं आयोजन करणार आणि मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात मनसैनिक सभेला कसे हजर राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राज ठाकरे हे जून महिन्यात अयोध्या दौरा करणार आहेत. त्याआधी या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अशात राज ठाकरेंची सभा रद्द झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र त्यांची सभा होणारच आहे हे आता स्पष्ट झालं आहे.
राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौरा करणार आहेत. राज ठाकरे यांच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संतांनी आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध दर्शवला आहे. यावर राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे. सर्व विरोधानंतरही राज ठाकरे अयोध्येला जाण्यावर ठाम आहेत. मनसेच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील विविध शहरांतून मनसे कार्यकर्ते अयोध्येला पाठवण्याची तयारी सुरू आहे. यासाठी 11 रेल्वेचं बुकिंग करण्यात येत आहे. राज ठाकरे अयोध्येत पोहोचण्यापूर्वी मनसे कार्यकर्ते तेथे पोहोचणार आहेत.
राज ठाकरे सध्या कुठला इतिहास वाचत आहेत?
ADVERTISEMENT