पुण्यातील एका महिलेचे तिच्याच इमारतीमध्ये राहणाऱ्या एका तरुणाशी प्रेमसंबध होते. याबाबतची माहिती तिच्या मुलीला मिळताच, तिने तिच्या प्रियकराच्या आणि त्याच्या मित्राच्या मदतीने १५ लाखाची खंडणी आईकडे मागितली होती. त्यापैकी १ लाख रुपये घेताना पोलिसांनी दोघांना रंगेहाथ पकडले असून एका आरोपीचा शोध घेतला जात आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांनी माहिती दिली.
ADVERTISEMENT
श्रीनिवास घाडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका इमारतीमध्ये पीडित महिला पती आणि मुलीसोबत राहत होती. त्याच इमारतीमध्ये राहणार्या एका तरुणाशी सुरुवातीला त्या महिलेची ओळख होती. नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्या दोघांमध्ये सतत फोन, व्हॉटसवर चॅटिंग होत असत. त्या दोघांमध्ये काही तरी सुरू आहे अशी माहिती त्या मुलीला मिळाली. त्यानंतर मुलीने आईचा मोबाईल पहिला असता त्यामध्ये त्या तरुणासोबतचे फोटो, चॅटिंग आढळून आले. यानंतर मुलीने हा सर्व प्रकार तिच्या प्रियकराला सांगितला.
त्या दोघांनी मिळून आईच्या प्रियकराला तू जर आम्हाला १५ लाख रुपये दिले नाहीस तर तुझे फोटो आणि मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करु, अशी धमकी दिली. या धमकीमुळे तो घाबरला,आपली बदनामी व्हायला नको, या कारणामुळे त्याने मे २०२१ ते ३ सप्टेंबर २०२१ पर्यन्त २ लाख ६० हजार रुपये वेळोवेळी दिले. तरीही त्या दोघांकडून सतत पैशाची मागणी होत राहिली आणि सतत मानसिक त्रास देणं सुरूच राहिलं.
वसई : प्रेमभंग झालेल्या तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवला जीव
अखेरीस तरुणाने पोलिसांना याबद्दल माहिती दिली असता पोलिसांनी सापळा रचला. ३ सप्टेंबर रोजी पीडित तरुणाला १ लाख रूपयांची मागणी केली आणि हे पैसे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती जवळ इथे देण्याचे ठरले. हे पैसे घेण्यासाठी आलेल्या मुलीला आणि प्रियकराला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं. या दोघांना साथ देणारा आणखी एका मित्राचा शोध घेतला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
गॅसचा पाईप पत्नीच्या तोंडात टाकून हत्या, आरोपी पतीला मध्य प्रदेशातून अटक
ADVERTISEMENT