‘नवजीवन व्यसनमुक्ती’च्या कृत्यांचा पदार्फाश! केंद्रात चालत होता भलताच धंदा

मुंबई तक

12 Mar 2023 (अपडेटेड: 23 Mar 2023, 08:39 PM)

Beed De-addiction center raids : बीडमध्ये व्यसनमुक्तीच्या नावाखाली गोरखधंदा सुरु होता. या गोरखधंद्याचा आता पर्दाफाश झाला आहे. या गोरखधंद्याची माहिती मिळताच चार व्यसनमुक्ती केंद्रांवर शनिवारी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांच्या मार्गदर्शनाखाली,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळेंच्या नेतृत्वात आरोग्य विभागाने (Health Department)पोलिसांच्या मदतीने छापेमारी केली होती. या छापेमारीत चारही केंद्रात मोठ्या प्रमाणावर एक्सपायरी औषधे (Expriry Medicine) आढळली,कोणत्याही केंद्रावर […]

Mumbaitak
follow google news

Beed De-addiction center raids : बीडमध्ये व्यसनमुक्तीच्या नावाखाली गोरखधंदा सुरु होता. या गोरखधंद्याचा आता पर्दाफाश झाला आहे. या गोरखधंद्याची माहिती मिळताच चार व्यसनमुक्ती केंद्रांवर शनिवारी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांच्या मार्गदर्शनाखाली,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळेंच्या नेतृत्वात आरोग्य विभागाने (Health Department)पोलिसांच्या मदतीने छापेमारी केली होती. या छापेमारीत चारही केंद्रात मोठ्या प्रमाणावर एक्सपायरी औषधे (Expriry Medicine) आढळली,कोणत्याही केंद्रावर वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक व आवश्यक असलेला कर्मचारी वर्ग आढळून आला नाही. तसेच रुग्णांवर चुकीच्या पद्धतीने मानसिक औषधे देऊन उपचार सुरु असल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी अद्याप तपास सुरु असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेने बीड (Beed)जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.(de addiction Center has become a refuge for addiction Patients were getting alcohol and drugs beed shocking story)

हे वाचलं का?

वाघाळा येथील केंद्रातील छळाबद्दल एका महिला डॉक्टरने (Women doctor) पोलिसांत तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर केंद्र संचालीकेसह इतरांवर शुक्रवारी विनयभंगाचा गुन्हा नोंद झाला होता. या घटनेनंतर आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या टीमने आणि पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पोलिसांच्या टीमसह नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राच्या अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा, मोरेवाडी केज शहरातील एक व बीड शहरातील एक अशा चार केंद्रांवर छापा टाकला. एकाचवेळी विविध केंद्रावर डॉक्टर आणि पोलीसांचे पथक पाठवून ही कारवाई करण्यात आली.

Japanese Girl Holi : संतापजनक! रंग लावण्याच्या बहाण्याने फॉरेनरसोबत अश्लील कृत्य

नातेवाईकांचा गंभीर आरोप

अंबाजोगाई-लातूर महामार्गावर असलेल्या वाघाळा येथे नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र आहे. व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून अव्वाच्या सव्वा फिस घेणे, पेशंटला दारू, नशेली पदार्थ पुरवणे, डांबून मारहाण करणे ,मुदत संपलेले औषध देणे एवढंच नाहीतर घराच्या बांधकामाचे वीट बिगारीचे काम करून घेत असल्याचा गंभीर आरोप केंद्रात उपचार घेतलेल्या पेशंटच्या नातेवाईकांनी केला होता.

चंद्रपूर: नववीतील विद्यार्थिनी गर्भवती, गावातील 19 वर्षाच्या तरूणाकडूनच..

दरम्यान या चारही केंद्रात मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांच्या पथकाला एक्सपायरी झालेली औषधे सापडली होती. कोणत्याही ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक व आवश्यक असलेला इतर कर्मचारी वर्ग आढळून आला नाही. रुग्णांवर चुकीच्या पद्धतीने मानसिक औषधे देऊन उपचार सुरु असल्याचे आढळून आले होते. वाघाळा येथे ७५, मोरेवाडीत २२, केजमध्ये १६ आणि बीड येथे २८ रुग्ण उपचार घेत होते.मात्र केंद्रातील ही दुर्दशा पाहून काही रुग्णांना घरी सोडण्यात आले तर काही रुग्णांना उपचारासाठी बीड, केज व अंबाजोगाई रुग्णालयात हलवण्यात आले. वाघाळा येथे जास्त संख्येने रुग्ण असल्याने हे केंद्र ताब्यात घेऊन इथेच त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार केले जाणार आहेत.

प्रियकराकडून डॉक्टर प्रेयसीची हत्या, लव्ह जिहादचा आरोप… प्रकरण काय?

औषध विभागाला या कारवाईची माहिती देऊन त्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. तसेच त्यांनी औषधी जप्त केली आहेत. या अनधिकृतरित्या चालत असलेल्या नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राचा भांडाफोड झाला असून नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका अंजली पाटील, राजकुमार गवळे आणि ओम डोलारे यांच्या विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    follow whatsapp