मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या भाषणात महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राज ठाकरेंनी आपल्या भाषणादरम्यान लक्ष्य केलं, तसेच राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांचीही नक्कल करत राज ठाकरेंनी त्यांना चिमटा काढला. राज यांच्या टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर देत आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.
ADVERTISEMENT
“राज ठाकरे या व्यक्तीला टिकेशिवाय आणि नकलांशिवाय काहीच जमलं नाही. आपण निवडून आणलेले १३ आमदार आपल्याला का सोडून गेले याचं त्यांनी आत्मपरीक्षण करावं. भाषण करुन जनतेचे प्रश्न सुटत नाही किंवा त्यांना रोजीरोटी मिळत नाही. राज ठाकरे हे पलटी मारतात, लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी केंद्र सरकारविरोधात भूमिका घेतली. त्यानंतर विधानसभेच्या काळात त्यांनी काय केलं हे देखील आपण पाहिलं आणि कालच्या सभेत काय केलं हे देखील आपण पाहिलं”, असं अजित पवार म्हणाले.
व्याख्यान देतात आणि भूमिगत होतात; राज ठाकरेंवर शरद पवारांचा पलटवार
आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधताना, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आल्यानंतर त्यांनी जातीपातीच्या राजकारणाला खतपाणी घातल्याचा आरोप केला. याला उत्तर देताना अजित पवारांनी राज ठाकरेंना त्यांनी घेतलेल्या शरद पवारांच्या मुलाखतीची आठवण करुन देत, एकेकाळी त्यांनी पवारांचं कौतुक केलं होतं आता त्यांना ते जातीयवादी वाटायला लागले आहेत असं म्हटलं. राज ठाकरे सध्या सरड्यासारखे रंग बदलत असल्याची टीकाही अजित पवारांनी केली.
राज ठाकरेंच्या भाषणाचं अभिनेत्री प्राजक्ता माळीकडून कौतुक, म्हणाली…
ADVERTISEMENT