(Devendra Fadnavis’s wife Amruta Fadnavis)
ADVERTISEMENT
नागपूर : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्यातील भाजप नेत्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांबद्दलच्या वक्तव्यावरुन सुरु झालेला वाद अद्याप ताजा आहे. या वक्तव्यांचा निषेध म्हणून ठिकठिकाणी मोर्चे निघाले होते. नुकताच महाविकास आघाडीनेही या वक्तव्यांचा निषेध म्हणून मोर्चाही काढला होता. (Devendra fadnavis’s wife amruta fadnavis controversial statment on mahatma gandhi and narendra modi)
अशातच आता उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयीच्या एका वक्तव्यावरुन चर्चेत आल्या आहेत. नागपूर येथे एका कार्यक्रमादरम्यान अमृता फडणवीस अभिरुप न्यायालयात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांना महात्मा गांधीविषयी एक प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना त्या बोलत होत्या.
नेमकं काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
यावेळी अमृता फडणवीस यांना विचारण्यात आलं की, नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तुम्ही त्यांना राष्ट्रपिता म्हटलं. मग जर नरेंद्र मोदी राष्ट्रपिता असतील तर महात्मा गांधी कोण आहेत? या प्रश्नावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, ‘महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत आणि मोदीजी नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असं माझं ठाम मत आहे. आपले दोन राष्ट्रपिता आहेत हे नवीन भारताचे आणि ते तेव्हाचे.
अमृता फडणवीस यापूर्वीही आपल्या अनेक वक्तव्यांमुळे वादात सापडल्या आहेत. त्यावरुन त्यांना टिकेलाही सामोरं जावं लागलं होतं. नुकतचं राज्यपाल कोश्यारींची पाठराखण केल्यामुळे देखील अमृता फडणवीस यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. राज्यपाल हे मनाने मराठी आहेत, महाराष्ट्रात आल्यावर त्यांनी मराठी भाषा शिकल्याचं त्या म्हणाल्या होत्या.
ADVERTISEMENT