ADVERTISEMENT
‘ठाण्याचे बाळ ठाकरे’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आनंद दिघे यांच्या आयुष्यावरील चित्रपट पडद्यावर झळकला.
‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’, असं या चित्रपटाचं नाव असून, या चित्रपटामुळे आनंद दिघे यांच्या आयुष्यातील घटना उजाळा दिला गेला.
आनंद दिघे यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांबरोबरच एक गोष्टीची चर्चा नेहमीच होते. ती म्हणजे त्यांच्या आर्माडा गाडीची.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावरील या चित्रपटात दिघे यांची आवडीची आर्माडा गाडी वापरण्यात आलेली आहे.
ही आर्माडा (एमएच ०५ – जी – २०१३) गाडी बघितली की, त्यावेळच्या शिवसैनिकांना आजही आनंद दिघे यांच्या आठवणींनी गलबलून येतं.
ही गाडी आनंद दिघे यांची ओळख होती. या गाडीला आजही शिवसैनिकांच्या मनात आदराच स्थान आहे.
आनंद दिघे कुठेही प्रवास करताना ही गाडी वापरायचे. त्यांनी राज्यभर गाडीतून प्रवास केला. त्यामुळे या गाडीसोबतचे अनेक प्रसंग शिवासैनिकांसोबत जोडले गेलेले आहेत.
या गाडीची खासियत म्हणजे शिवसैनिकांना लगेच तिची चाहूल लागायची आणि आनंद दिघे आल्याचंही कळायचं.
जवळपास २० वर्षांपूर्वी याच गाडीतून प्रवास करत असताना आनंद दिघे यांचा अपघात झाला होता. त्यानंतर ही आर्माडा गाडी कधीच रस्त्यावर दिसली नाही.
ADVERTISEMENT