मर्चंट नेव्हीमध्ये असलेला धुळ्यातला तरूण अरबी समुद्रात बेपत्ता, कंपनीने कुटुंबाला सांगितलं पाय घसरून...

26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी यश देवरे आणि त्यांच्या काही मित्रांनी राष्ट्रध्वज फडकवला. त्यावेळी झालेल्या काही वादातून ही घटना घडल्याचा संशय यश देवरे यांच्या भावाने व्यक्त केला आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

11 Feb 2025 (अपडेटेड: 11 Feb 2025, 09:26 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मर्चंट नेव्हीमध्ये असलेला तरूण बेपत्ता

point

अनेक दिवसांपासून कुटुंबाशी संपर्क नाही

point

कंपनीने सांगितलं पाय घसरूण, समुद्रात...

मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारा देऊर येथील तरुण यश देवरे ओमानच्या समुद्रात बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. बारा दिवस उलटूनही यशचा कोणताही पत्ता लागलेला नाही. मूळ धुळे तालुक्यातील देऊर येथील रहिवासी आणि मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारा यश देवरे नावाचा तरुण अरबी समुद्रात बेपत्ता झाला असून बारा दिवसांनंतरही त्याचा शोध न लागल्याने त्याच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> 'शिंदे साहेब बाळासाहेबांनंतर तुम्हीच शिवसेना घडवली', आशा भोसलेंवर रश्मी ठाकरे संतापल्या!

ठाणे येथील स्वराज सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ऑपरेटिंग सिस्टम यश कर्मचारी म्हणून काम करतो. 28 जानेवारी रोजी तो सौदी अरेबियातील ओमानमध्ये असताना त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं शेवटचं बोलणं झालं होतं. पण तेव्हापासून त्याच्या कुटुंबाचा त्याच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही. तसंच, 29 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता संबंधित शिपिंग कंपनीने देवरे कुटुंबाशी संपर्क साधला आणि यश चालत्या जहाजातून समुद्रात घसरून बेपत्ता झाल्याची माहिती दिली. मात्र, बारा दिवस उलटूनही यश अद्याप बेपत्ता असल्याने कुटुंबीयांनी चिंता व्यक्त करत ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

यशच्या जवळच्या मित्रांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना घटनेची माहिती दिली आहे. यशला शोधण्यासाठी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच यश देवरे यांच्या कुटुंबीयांनी कंपनीशी संपर्क साधला तेव्हा त्यांना कुठलंही स्पष्ट उत्तर मिळालं नाही. तर संपर्क क्रमांकही गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. तर 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी यश देवरे आणि त्यांच्या काही मित्रांनी राष्ट्रध्वज फडकवला. त्यावेळी झालेल्या काही वादातून ही घटना घडल्याचा संशय यश देवरे यांच्या भावाने व्यक्त केला आहे.

हे ही वाचा >>शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंतांच्या मुलाचे अपहरण, काय आहे Inside Story?

दरम्यान, एमटी अथेना 1 हे जहाज या आठवड्यात ओमानहून गुजरातमधील अलंग येथे पोहोचणार होतं. पण देवरे कुटुंबाने तक्रार केली आहे की अधिकारी जहाज कधी येणार याची माहितीच देत नाहीयेत. आगमन वेळेची माहिती देत ​​नाहीत.

    follow whatsapp